Ambadas Danve, Uddhav Thackerey & Sandipan Bhumre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ambadas Danve Politics: अंबादास दानवे यांनी संदिपान भुमरे यांचे सगळेच काढले, म्हणाले, 'स्लिपबॉय ते मद्यसम्राट प्रवास सर्वश्रृत आहे'

Shivsena UBT Sambhaji Nagar Agitation, ambadas danve replied Sandipan Bhumre, who made minister to sandipan bhamre -उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या संदिपान भुमरे यांना अंबादास दानवेंनी खडसावले

Sampat Devgire

Shivsena UBT News: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा झाला. या मोर्चातील भाषणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चांगलीच झोंबली. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले.

हंबरडा मोर्चा झाल्यावर खासदार संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केले? असा प्रश्न खासदार भुमरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाचे देखील त्यांनी केलेली उडवली.

खासदार संदिपान भुमरे यांची ही टीका शिवसेना नेत्यांना चांगलीच झोपली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी खासदार भुमरे यांना उत्तर दिले आहे.

खासदार भुमरे यांच्या टीकेवर अंबादास दानवे यांनी त्यांचे सगळेच काढले. दानवे म्हणाले, संदिपान भुमरे यांच्या ध्यानीमनी नसताना त्यांना पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री कोणी केले? याचा विसर भुमरे यांनी पडू देऊ नये. आपण कोणामुळे राजकारणात स्थिरावलो हे ते विसरलेले दिसतात.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यावर कोविडचे मोठे संकट होते. या कारकीर्दीत अनेक खात्यांचा निधी कोविड संकटाशी लढण्यात वर्ग झाला. मात्र भुमरे यांच्या रोजगार हमी योजनेचा एक रुपयाही निधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कमी केला नव्हता.

खासदार भुमरे यांनी २०१९ पर्यंत विधानसभा आणि अन्य निवडणुका लढवल्या. या निवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारी कोणी दिली?. संदिपान भुमरे यांच्या निवडणुकीच्या फॉर्मवर कोणाची सही होती? असा प्रश्न दानवे यांनी केला.

खासदार भुमरे यांच्या मुलाला जिल्हा परिषद सदस्य उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेनेच केले. आपल्या मुलगा जिल्हा परिषदेचा सभापती झाला. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे योगदान होते.

सध्या मात्र खासदार भुमरे आपला पूर्व इतिहास विसरून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत. भुमरे यांचा स्लीप बॉय ते मध्य विक्री सम्राट हा प्रवास सर्वश्रुत आहे, या शब्दात दानवे यांनी संदिपान भुमरे यांचे सगळेच काढले.

खासदार भुमरे यांनी आपली शक्ती ज्यांच्यामुळे राजकारणात आलो त्यांच्यावर टीका करण्यात घालवू नये. दानत आणि हिम्मत असेल तर शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती करण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडावे. त्यासाठी आपली ताकद खर्च करावी. मात्र ते तुमच्या अवाक्या बाहेर आहे, याची जाणीव सगळ्यांनाच आहे, असे एक्स वरील पोस्टमध्ये दानवे म्हणतात.

---------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT