
Nashik News : नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना बघता नाशिक पोलिसांनी त्याविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. अगदी काही राजकीय पदाधिकाऱ्यांनाही 'पोलिसी खाक्या' दाखविण्यात आला आहे. स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्तांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिली आहे. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो त्याला पाठीशी घालू नका, मग तो भाजपचा असला तरी सोडू नका, त्याच्यावर कारवाई करा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकारपरिषद घेत शहरातील गुन्हेगारीवर होणाऱ्या कारवाईसंदर्भात माहिती दिली आहे. तसेच त्यांनी नाशिककरांना काही आवाहनही केले आहे. कुठलाही गुन्हेगार असो छोटा असो वा मोठा, राजाश्रय मिळालेला असो किंवा कुणीही असो, कुणीच पोलिसांच्या कारवाईतून सुटणार नाही, असा विश्वास देत आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिककरांनीही अशा गुन्हेगारांबाबतची माहिती पोलिसांना विश्वासाने कळवावी, पोलिस थेट कारवाई करतील असे आवाहन केले आहे.
संदीप कर्णिक म्हणाले की, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली होती. ती कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हाला फ्री हॅन्ड दिला आहे. छोटा-मोठा कोणताही गुन्हेगार असला, तरी त्याच्यावर पोलिसांकडून धडक कारवाई सुरू केली आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीम हाती घेतल्या आहेत. एखादा ग्रुप स्थापन करणे, गँग तयार करणे, गरीब लोकांची पिळवणूक करणे, त्यांच्या जमिनी, टपऱ्या हडप करणे यासंदर्भात कारवाई केली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पोलिस आयुक्त म्हणाले, पोलिसांवर विश्वास ठेवा. कोणताही भाई. बॉस. सरकार म्हणणाऱ्यांना तसेच कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्ज लावून जर कोणी भाईगिरी करत असेल, मद्यधुंद अवस्थेत दंगल करत असेल किंवा टवाळखोरी करत शांतता भंग करत असेल. तर तुम्ही फक्त एकदा तुमच्या नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये येऊन आम्हाला सांगा आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करु असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिककरांना केले आहे.
नाशिककरांनी कोणाच्याही दहशतीखाली न वावरता त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस विश्वासाने कारवाई करतील असा विश्वास पोलिस आयुक्तांनी दिला आहे. तसेच ही कारवाई भविष्यात आणखी कठोर होणार असल्याचे कर्णिक यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.