Ahmednagar News : अहमदनगरचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरासह नगरमधील 15 मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर शहरातील 15 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू होत असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील धनवट यांनी दिली.
याआधी नागपूर, अमरावती येथील काही मंदिरात वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता नगर शहरातील 15 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगरचे ग्राम दैवत विशाल गणपती मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनील धनवट यांनी ही माहिती दिली. विशाल गणपती मंदिर, तुळजाभवानी मातेचे माहेर म्हणून ओळख असलेले बुऱ्हाणनगर येथील अंबिका माता मंदिराबाहेर वस्त्रसंहितेचे फलक लावण्यात आलेत.
धनवट म्हणाले, "अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी जळगाव येथे 4 आणि 5 फेब्रुवारी 2023 मध्ये मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय 'महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत उपरोक्त ठराव संमत करण्यात आला होता. तसेच नगर येथे 7 मे 2023 रोजी झालेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये याविषयी चर्चा आणि ठराव संमत झाला होता. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीमध्ये सुद्धा याविषयी निश्चय झाला आहे", असं धनवट म्हणाले.
नगमधील 'या' मंदिरात वस्त्र संहिता लागू
श्री तुळजाभवानी माता मंदिर, बुऱ्हाणनगर, शनि मारुती मंदिर माळीवाडा, शनि मारुती मंदिर दिल्ली गेट, शनिमारुती मंदिर झेंडीगेट, तुळजाभवानी मंदिर सबजेल चौक, श्रीगणेश राधाकृष्ण मंदिर मार्केट यार्ड, श्रीराम मंदिर पवननगर सावेडी, विठठल रुक्मिणी मंदिर वाणीनगर या मंदिरासह जिल्ह्यातील सर्व मंदिरांमध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित करण्यात आले.
दरम्यान, मंदिराची संस्कृती पावित्र्य आणि मांगल्य टिकून रहाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं माळीवाडा पंच मंडळ देवस्थान ट्रस्टचे अभय आगरकर यांनी सांगितलं. तसेच मंदिरामध्ये वस्त्र संहिता लागू करणे म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणं असं नाही तर ते मंदिराच पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, असं तुळजाभवानी मंदिराचे प्रमुख अभिषेक भगत यांनी सांगितलं.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.