

MP Arvind Sawant on BJP Leaders : भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री हे महाराष्ट्रातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारे भाष्य करून दररोज लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, महाराष्ट्रातील तमाम जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत म्हणाले. (Maharashtra is standing behind Uddhav Thackeray)
अकोला जिल्ह्यातील पिंजर येथे नुकताच शिवसेनेचा मेळावा पार पडला, त्यावेळी खासदार सावंत बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची प्रामाणिकता आणि निष्ठा, लक्षात घेता, उभा महाराष्ट्र उद्भव ठाकरेंच्या मागे उभा आहे. सहानुभूतीची लाट निर्माण होत आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या राज्यात सुशिक्षित बेरोजगारी संख्या वाढत आहे, महागाई वाढत आहे.
शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, मजुराच्या हाताला काम नाही, शेतकरी हिताची कामे राज्यात होत नाहीत. याकडे भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार, खासदार, मंत्री लक्ष देत नाहीत, उलट इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर गप्पा करून वेळ मारून नेतात. बार्शीटाकळी तालुका प्रमुख गजानन मानतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यात शिवसेनेला अधिक मजबूत करण्यासाठी आयोजित मेळाव्यात अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
खासदार सावंत (Arvind Sawant) यांच्या उपस्थितीत या सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार नितीन देशमुख, (Nitin Deshmukh) गोपाल दातकर, अमित सावंत, माया म्हैसने, तालुका प्रमुख गजानन मानतकर, गोपाल भटकर, उमेश राऊत, अरविंद काकड, नितीन इंगळे, योगेश लावडकर, सभापती सुनंदा मानतकर, बंडू शिंदे, गणेश वक्टे, किशोर घुगे, गजानन ठाकरे, अशोक इंगळे, वैभव केदार, संतोष सोनटक्के, जीवन राऊत, गजानन चौधरी, कृष्णा पाचे, प्रदीप खांडे, भागवत हातोलकर, निलेश पाटील, निखिल ठाकरे, खंडू तुरुक, जगदेवराव छबिले, उल्हासराव लहाने, गजानन ठाकरे, आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.