Nashik ACB Action  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik ACB Action : एक लाख पगार पण मोह आवरेना! 500 रुपयांची लाच घेताना उपअधीक्षक अटकेत, शेतकऱ्याने शिकवला धडा!

Devendra Bhavsar Arrested ACB : एसीबीने भूमी अभिलेख उपअधीक्षकाला शेतकऱ्याकडून 500 रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. या लाचखोर अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Roshan More

Nashik News : महिन्याचे वेतन एक लाखाहून अधिक असलेल्या अधिकाऱ्याला लाच घेण्याचा मोह अवरला नाही. 500 रुपयांची लाच घेताना एसीबीने या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.

वडिलोपार्जित घराच्या मालमत्तेवर वारसा हक्काने नाव लावण्यासाठी शेतकऱ्याने अर्ज केला होता. मात्र भूमी अभिलेख विभागाने त्यासाठी महिन्याहून अधिक काळ शेतकऱ्याला ताटकळत ठेवले. रोजच्या चक्रा मारून वैतागलेल्या या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

भूमी अभिलेख उपअधीक्षकाने नाव लावण्यासाठी पैशांची वारंवार मागणी केली. त्यामुळे पाठपुरावा करून थकलेल्या या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 28 ऑक्टोबरला केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने तपास केला.

उप अधीक्षकाने तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यात भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक देवेंद्र मधुकर भावसार हे 500 रुपये घेताना सापडले.

गुन्हा दाखल

या कारवाईनंतर लातूर प्रतिबंधक विभागाने भावसार यांच्याविरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भावसार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे.

एसीबीचे अधीक्षक भरत तांगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. नाशिक विभागात गेल्या महिन्याभरात जवळपास रोजच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तरीही लाच मागण्याचे धाडस कमी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT