Jalgaon Bribe : शेत मोजणीसाठी मागितले दोन हजार, भूमिअभिलेख कार्यालयातील शिपायासह सायबर कॅफे चालक ACB च्या जाळ्यात

Jalgaon Bribe News : शेतजमिनीच्या मोजणीसाठी दाखल केलेल्या अर्जातील त्रुटी दूर करण्याच्या मोबदल्यात भूमिअभिलेख कार्यालयातील शिपायासह सायबर कॅफे चालकाने मिळून दोन हजारांची लाच मागितली.
bribe News
bribe NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon Bribe News : शेतजमिनीच्या मोजणीसाठी दाखल केलेल्या अर्जातील त्रुटी दूर करुन पुढील कार्यवाही करून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली. यामध्ये भूमिअभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन किसन पाटील (वय ४५) आणि सायबर कॅफेचालक राकेश रामदास चव्हाण (वय ४३) या दोघांचा समावेश आहे.

तक्रारदार हे भुसावळ तालुक्यातील शेतजमिनीचे मालक आहेत. त्यांनी ५ सप्टेंबरला शेतमोजणीसाठी चव्हाण सायबर कॅफेमार्फत ऑनलाइन अर्ज दाखल केला होता. या प्रक्रियेसाठी त्यांनी दोन हजार रुपये शुल्कही भरले होते. मात्र, त्यानंतर अर्जात त्रुटी असल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला. त्यावर त्यांनी ३० सप्टेंबरला सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण यांच्याशी संपर्क केला.

त्यावेळी सायबर कॅफेचालक राकेश चव्हाण यांनी भूमिअभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन पाटील यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगत काम करून देण्याचे आश्वासन दिले. पुढे आवश्यक कागदपत्रांबाबत पुन्हा विचारणा केली असता, सचिन पाटील यांच्या माध्यमातून काम करून देण्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला. यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

bribe News
Borivali Police Bribe Case : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी चक्क पोलीस स्टेशनमध्येच दीड लाखांची 'डील' : ACB च्या कारवाईमुळे PSI चा पर्दाफाश

त्यानंतर एसीबीने १६ ऑक्टोबरला तक्रारीची पडताळणी केली. त्यात तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून ‘ACB’ने सापळा रचला. राकेश चव्हाण यांनी तक्रारदाराला दोन हजार रुपये देण्यास प्रवृत्त केले, तर सचिन पाटील यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या प्रकरणी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

bribe News
Bribery Case : २० लाखांचा सौदा, ५० हजारांचा सापळा! PMC चा अधिकारी ACBच्या जाळ्यात, रंगेहात पकडले!

ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक हेमंत नागरे, उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी किशोर महाजन, मनोज पाटील व प्रणेश ठाकूर यांनी केली. ही घटना केवळ एका प्रकरणापुरती मर्यादित आहे का? कॅफेचालक व शिपाई सचिन पाटील यांच्याकडून जमीन मोजणीशी संबंधित कामात आणखी किती लोकांकडून पैशांची मागणी झाली आहे, याचाही तपास व्हावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com