Dhule ACB: दुष्काळातही शेतकऱ्यांची अडवणूक! 100 रुपयांची लाच घेताना वनरक्षक ACB च्या जाळ्यात

ACB Action in Dhule: धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे दुष्काळग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवश्यक कागदपत्रांबाबत लाच मागितल्याच्या आरोपावरून वनरक्षकाला ACB ने सापळा कारवाईत पकडले.
ACB Action in Dhule
ACB Action in DhuleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Dhule Drought News: लाच घेण्याबाबत शासकीय कर्मचारी कोणत्या थराला जातात याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात, शिरपूर (धुळे) येथेही असाच धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

सध्या राज्यात दुष्काळी स्थिती आहे. पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. धुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचे उपाय केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर सांगवी (शिरपूर) येथील आदिवासी शेतकऱ्यांनी शासकीय मदतीसाठी पाठपुरावा केला होता. त्यासाठी वन जमिनीवर शेती करणाऱ्या या आदिवासींना वन हक्क 'जे' फॉर्म भरून देणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांची अडवणूक सुरू होती.

ACB Action in Dhule
Maval Politics: महायुतीत ठिणगी! सुनील शेळकेंनी भाजपला डिवचलं; भाजपने मोर्चातून दिलं उत्तर, मावळात युतीचा ‘खेळ’ बिघडला?

या संदर्भात तक्रारदाराने वनरक्षक राहुल रामदास बहिरम (वय 30) रा. ढवळी विहीर, जेबापूर यांच्याकडे आपल्या वडिलांचं १४ आदिवासी शेतकऱ्यांचे अर्ज भरून दिले होते. मात्र वनरक्षक बहिरम यांनी दुष्काळग्रस्तांची मदत मिळण्यासाठी लागणारा दाखला देण्यासाठी पैशांची मागणी केली.

ACB Action in Dhule
Teacher News: 'शिक्षकांसाठी AI साथी' ऑनलाईन कोर्सला दुसऱ्यांदा मुदतवाढ; SCERT चा निर्णय, 30 नोव्हेंबरची डेडलाईन

प्रत्येक आदिवासी शेतकऱ्यांकडून शंभर रुपये याप्रमाणे दीड हजार रुपये लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष सचिन साळुंखे आणि पोलीस निरीक्षक पद्मावती कलर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

धुळे जिल्ह्यात बहुतांशी आदिवासी शेतकरी आहेत. पाऊस नसल्याने या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांनी अन्यत्र स्थलांतर देखील केले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळातही आदिवासी शेतकऱ्यांनाही लाच घेण्यासाठी न सोडणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची ही घटना धक्कादायक मानली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com