DCM Devendra Fadnavis  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon DCM Devendra Fadnavis : नार-पार प्रकल्पाच्या टेंडरवर कॅबिनेटमध्ये काय झालं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मोठा निर्णय

Pradeep Pendhare

Jalgaon Lakhpati Didi Yojna : जळगाव जिल्ह्यात लखपती दीदी संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरणा नदीवरील नार-पार प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली असून, कॅबिनेटमध्ये टेंडर काढणार असल्याचे सांगितले.

जळगाव जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्याचे काम करणार असून, वाघुर प्रकल्पाला 2 हजार 288 कोटी, पाडळसे प्रकल्पाला 4 हजार 800 कोटी देऊन शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम करण्याचे काम करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थित जळगाव येथे लखपती दीदी संमेलन झाले. या संमेलनाच्या माध्यमातून देशभरातील महिलांना सहा हजार कोटी रुपयांची लाभ दिला जाणार आहे. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्याचे काम आम्ही करत आहोत, असे सांगितले.

जळगांवमध्ये आयोजित लखपती दीदी संमेलनाला उपस्थित राहून महिलांनी सगळे रेकाॅर्ड तोडले आहे. त्यांचे अभिनंदन करत देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना संधी दिली, तर विश्व बदलून शकतात. विकसित भारत हा महिल्यांच्या माध्यमातून होऊ शकतो, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त करतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेत महिलांना आणण्यावर भर महायुती सरकार काम करत आहे, असे सांगितले. बेटी बचाव, बेटी पढाओ ते लखपती दीदीपर्यंतचा विकास हा अद्वितीय, असा आहे. पंतप्रधान मोदी यांनी 2029 नंतर देशाचा कारभार महिलांनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. आता नारीशक्तीला कोणी रोखू शकत नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीवार्दाने राज्यात नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लाकडी बहीण योजना असेल, किंवा मुलींना मोफत शिक्षण व्यवस्था, अर्ध्या पैशात एसटी मोफत तिकीट असेल, गॅस सिलिंडरची योजना मोदींचे स्वप्न आहे, भारताला विकसित करण्यात महाराष्ट्र कोठेही मागे राहणार नाही", असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

"महाराष्ट्रात 75 लाख परिवार बचत गटाशी जोडलेले आहेत. लवकरच ते 2 कोटीपर्यंत पोचवण्याचे काम करणार आहोत. बचत गटांना फिरतं भांडवल दुप्पट केले आहे. महिलांना दिलेला पैसा परत करतात, ते एक पैसाही बुडवत नाही. त्यामुळे महिलांसाठी काम करण्याकरिता बँक, सोसायट्या तयार आहेत. म्हणून महिलांचे विशेष अभिनंदन करतो", असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT