Raj Thackeray : राज ठाकरेंचे शिलेदार CM शिंदे आणि फडणवीसांना भिडणार

Raj Thackeray on action mode for assembly elections : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीविरुद्ध लढा पुकारला आहे.
Raj Thackeray 1
Raj Thackeray 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत 'एकला चलो रे', अशी भूमिका घेतली आहे. राज्यातील 225 ते 250 जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला असून, सत्ताधारी आणि विरोधकांवर तुटून पडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देखील उमेदवार देणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरेंनी ही भूमिका नागपूरमधून जाहीर केली आहे.

राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत राज्यात 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीला मात्र वेगळी भूमिका घेत, महायुतीपासून लांब राहिले. आता मनसे राज्यात सुमारे 225 ते 250 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्याने महाविकास आघाडी आणि महायुती, अशी दोन्ही सरकार पाहिले आहे. मनसेला आता राज्यात पोषक, असे वातावरण आहे, असे म्हणत राज ठाकरे राज्य दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातून ते महायुती सरकार आणि महाविकास आघाडींच्या धोरणांवर जोरदार प्रहार करत आहेत.

Raj Thackeray 1
Sumantai Patil : आमदार सुमनताई पाटलांची निधीवरून कोंडी; बांधकाम मंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून विचारला सवाल

'सुपारी'वरून मनसे आणि शिवसेना (Shiv Sena) ठाकरे पक्षात चांगलाच राडा झाला. हा राडा राज्यात गाजला. यानंतर राज ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणाचा चिखल शरद पवार यांनी केला, असल्याची जहरी टीका केली. जातीचे विष पवारांनी कालवले. संतांची आडनावे राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली. महापुरुषांची विभागणी राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच केली जाऊ लागली, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर देखील राज ठाकरे यांनी भाष्य केले. योजनेसाठी राज्याकडे पैसेच नाही, त्यामुळे ही योजना बंद पडणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले. आता तर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देखील उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले.

Raj Thackeray 1
Sanjay Raut: फडणवीस महोदय, तुमच्या मुली सुरक्षित, पण गरीब, मध्यमवर्गीयांच्या मुली वाऱ्यावर; कारण....

आदित्यविरुद्ध उमेदवार निश्चित

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. विधानसभा 2019 मध्ये आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. यावेळी मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. त्यामुळे निवडणूक लढणार आहे. वरळीत मनसेची साधारण 37 ते 38 हजार मते आहे, असे सांगून वरळीतून उमेदवार देण्याबाबत राज ठाकरे यांनी संकेत दिले. राज्यातील जनता नक्की राज्य हातात देईल, असा विश्वास देखील राज ठाकरेंनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com