Girish Mahajan & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra fadnavis Politics: नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन निश्चित? हे आहे कारण...

Devendra Fadnavis; BJP and CM Fadnavis Insistent Girish Mahajan Nashik guardian minister-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गिरीश महाजन यांच्या नावासाठी आग्रही असल्याची चर्चा, आज निर्णय?

Sampat Devgire

Girish Mahajan News: नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा गेले दोन आठवडे कायम आहे. यावर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यामुळे हा प्रश्न आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे.

राज्यातील बीडची घटना आणि अन्य काही प्रश्नांवरून राज्य शासन व राज्याचे कारभारी दोघेही व्यस्त आहेत. यामध्ये राज्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्ती रखडल्या आहेत. या नियुक्त्यांमागे महायुतीतील नेत्यांचा चार जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण? यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे.

नाशिक, ठाणे, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीसाठी महायुतीचे सर्वच नेते आग्रही आहेत. प्रत्येकाने आपल्याच पक्षाच्या मंत्र्याकडे कारभार सोपवावा यासाठी आग्रह धरला आहे. त्यासाठी जोरदार लॉबिंग देखील सुरू आहे. त्यामुळे हा प्रश्न रखडला. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष आग्रही आहेत.

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत. या पक्षाचे नाशिक जिल्ह्यात जिल्ह्यात सात आमदार आहेत. रायगड जिल्ह्यात मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अधिक आहेत. त्यामुळे यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रस्सीखेच आहे.

या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज चर्चा करणार आहेत. त्यातून हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे. हा निर्णय येत्या एक दोन दिवसांत होईल. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनीही तसेच संकेत दिले आहेत.

नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपच्या आमदारांनी ही मुख्यमंत्र्यांना भेटून तशी मागणी केली आहे. जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असूनही कोणालाही मंत्रिपदासाठी संधी मिळालेली नाही. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आपला व्हेटो वापरून गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध खात्यांची मागणी केली होती. ती पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिक, ठाणे, रायगड आणि पालघर या चारही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची घोषणा लांबली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT