Vikhe and Shinde : विखे - शिंदेंची एकमेकांवर स्तुतीसुमने अन् बाळासाहेब थोरातांना टोमणे!

Ram Shinde and Radhakrishna Vikhe Patil on Thorat : जाणून घ्या, विखे पाटील आणि राम शिंदे बाळासाहेब थोरात यांच्याबाबत काय म्हटलं?
Ram Shinde and Radhakrishna Vikhe Patil
Ram Shinde and Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ram Shinde and Radhakrishna Vikhe Patil News : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. एकमेकांची स्तुती करताना दोघांनीही नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना मात्र टोमणे लगावले आहेत.

नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी जिल्ह्यातील महायुतीचे आमदार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी भाषणादरम्यान एकेकाळी अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपमधील प्रतिस्पर्थी असलेले विखे आणि शिंदे यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुक केल.

यावेळी मंत्री विखे पाटील यांनी भाषणातून नाव न घेता बाळासाहेब थोरातांना(Balasaheb Thorat) टोले लगावले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही लोकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावले होते. नेवासा तालुक्यातील देखील काहींनी भावी मंत्री म्हणून बोर्ड लावले होते. जनतेने या सर्वांची स्वप्न धुळीस मिळवली. असं विखे म्हणाले.

Ram Shinde and Radhakrishna Vikhe Patil
Shivsena Shinde politics: ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गोटात!

राम शिंदेंबाबत(Ram Shinde) बोलताना विखे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील नेते राम शिंदे हे आपल्या सुदैवाने विधानपरिषदेचे सभापती झाले आहेत. त्यांच्यामुळे जिल्ह्याचा बहुमान वाढला. आम्ही मंत्री असलो तरी मंत्र्यांना आदेश देण्याचा अधिकार सभापतींना असतो. मंत्र्यांना आदेश देण्याचे भाग्य आपल्या जिल्ह्याला मिळाले. आपल्या सर्वांना राम शिंदेंचे कौतुक आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यात विकासाची कामे करताना मोठी मदत होणार आहे.

राम शिंदे भाषणात म्हणाले, थोरात म्हणजे मोठे प्रस्त त्यांच्या समोर उमेदवार फक्त नावापुरते उभे राहायचे. मात्र तिथे मोठी क्रांती झाली. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणाऱ्याला अमोल खताळ यांनी विखे पाटलांच्या आशीर्वादाने घरी पाठवले. तसेच विखे पाटील यांचे कौतुक करतान राम शिंदेंनी सांगितले की, विखे पाटील म्हणजे चिरकाल नेतृत्व. त्यांची आता आठवी टर्म आहे. तर पुढच्या वेळी आपल्या सर्वांना आठवून त्यांना नवव्यांदा निवडून आणायचंच. पुढच्या वेळी ते विधानसभेतील सर्वात जेष्ठ आमदार असणार. कालिदास कोळंबकर पुन्हा उभे राहणार नाहीत, असे ते मला म्हणाले आहेत.

Ram Shinde and Radhakrishna Vikhe Patil
Nashik Politics: भाजपअंतर्गत राजकारणाने रखडली चक्क "गोदेची आरती"

विखे पाटलांनी सांगितलं की माझ्याकडे आदेश देण्याचे काम आहे. मात्र सभापती म्हणून मी नवीन आहे. नगरहून निघालो तेंव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला. त्यांनी माझी तारीख मागितली. लोकायुक्त नेमणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन माझ्या दालनात होणार आहे. हा प्रोटोकॉल तर मोठा आहे. जबाबदारी मोठी असली तरी टाकलेली जबाबदारी पार पाडणे माझ्या रक्तात आहे. दिलेले पद आणि जागा यावर स्वतःला सिद्ध करावे लागेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com