Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून केली आत्महत्या... काय आहे प्रकरण?

Nashik Land Deal Fraud Case : धक्कादायक, सोलापूर येथील आर्थिक व्यवहारातून नाशिकच्या सराफी व्यवसायिकाची आत्महत्या

Sampat Devgire

Nashik News: आर्थिक फसवणूक आणि जमिनीचे व्यवहार हे एक समीकरण झाले आहे. यातून अनेकांना मोठी आर्थिक सोसावी लागते. असेच एक मोठे प्रकरण नाशिकमध्ये पुढे आले आहे. त्यात फसवणूक झालेल्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आत्महत्येचा प्रकार घडला.

नाशिक येथील एका व्यापाऱ्याने सोलापूर येथील एका व्यापाऱ्याशी जमीन व्यवहार केला होता. त्यामध्ये सुमारे पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र या संदर्भात लिखित व्यवहार होऊ नये दोघांमधील बेबनाव वाढला. त्यातून ही फसवणूक घडल्याचे पुढे आले आहे.

या प्रकरणात व्यावसायिक प्रशांत गुरव यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना पत्र लिहीले. त्यानंतर विष प्राशन करून गळफास घेतला. त्यांचे चिरंजीव अभिषेक यांच्या पोटातही विष असल्याचे आढळले. त्यांनी देखील आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे बाप लेकाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात प्रशांत गुरव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये दिलीप सचदेव अर्थात मोहन सचदेव सोलापूर याने तसेच अमोल यादव व प्रशांत गुरव यांच्या दरम्यान न्यायालयासमोर कुथेर नाका, सोलापूर येथे जमिनीचे हक्क सोड व्यवहार झाले होते.

त्यानंतर मोहन शेठ याला पाच कोटी रुपये देण्याचे ठरले होते. त्यातून एक कोटी रुपये गुरव यांचे वजा करायचे ठरले होते. मात्र नंतर सचदेव याने आपला शब्द फिरवला. कोर्टासमोर लिहून देऊ नये रक्कम देण्यास नकार दिला. या व्यवहारातील पाच कोटी रक्कमेपैकी ७५ टक्के रक्कम गुरव कुटुंबियांना द्यायचे ठरले होते. मात्र तो व्यवहार न झाल्याने गुरव कुटुंब तणावात होते. त्याचवेळी त्यांना व्हाट्सअप वरून धमक्याही देण्यात येत होत्या.

त्यामुळे त्यांनी `मला त्रास देणाऱ्या या माणसांवर कारवाई करावी`, अशी चिठ्ठी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने गुरव यांनी लिहिली आहे. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली यासंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आता याबाबत थेट गृहमंत्र्यांनाच पत्र लिहून आत्महत्या झाल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT