BJP MLA Sanjay Kute, a trusted aide of CM Devendra Fadnavis, still awaits a ministerial berth as discontent brews among workers. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Fadnavis Government : आमदारकीची पाचवी टर्म, तरीही फडणवीसांनी मंत्रिपदापासून लांब ठेवलं; वर्षापासून दाबून ठेवलेलं दुःख साईबाबांच्या भजनातून बाहेर

BJP Politics: जळगाव जामोदचे भाजप आमदार संजय कुटे यांना अजूनही मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. फडणवीस यांचे विश्वासू असतानाही त्यांची मंत्रीपदातून उपेक्षा झाली आहे.

Deepak Kulkarni

पंजाबराव ठाकरे

Jalgaon News: जळगाव (जा.) मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी गेल्या आठवड्यात शहरातील एका कार्यकर्त्याच्या घरी झालेल्या साईभजन कार्यक्रमात “लब पे दुआएं, आंखों में आंसू, दिल में उम्मीद... पर झोली खाली...” हे भजन गायले. हे भजन गायलेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला असून, राजकीय वर्तुळात या भजनाच्या आशयावरून चर्चेला उधाण आले आहे.

डॉ.संजय कुटे (Sanjay Kute) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विश्वासू मानले जातात. मात्र, सत्तेला एक वर्ष पूर्ण होत असतानाही कुटे यांना मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, “झोली खाली” या ओळींमुळे त्यांच्या मनातील खंत आणि भावनाच व्यक्त झाल्या, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

डॉ. संजय कुटे यांनी भाजपच्या तिकिटावर सलग पाचव्यांदा विजय मिळवला. त्यावेळी त्यांच्या नावावर मंत्रिपदाची चर्चा रंगली होती. शिवाय, फडणवीसांचे विश्वासू म्हणून त्यांनी पक्षाच्या अनेक महत्वाच्या मोहिमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. मात्र, सत्तास्थापनेनंतर मंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांना संधी न मिळता, पक्षाने इतरांना प्राधान्य दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती.

sanjay kute.jpg

तथापि, कुटे यांनी पक्षनिष्ठेचे उदाहरण घालत समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले. “भाजप (BJP) म्हणजे आपलेच घर आहे. घरात कधी कधी मनाविरुद्ध निर्णय होत असतात. ते मोठ्या मनाने स्वीकारावे लागतात.” असे उदारतावादी आवाहन केले होते.

आजही डॉ. कुटे पक्षनिष्ठ राहून दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. मंत्रिपद मिळाले नाही तरी फडणवीसांवरील त्यांची श्रद्धा कमी झालेली नाही. फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी कुटे यांच्या घरी भेट देत सांत्वनपर संवाद साधल्याने दोघांतील संबंध पूर्ववत असल्याचे संकेत मिळले होते.

मात्र, सत्तेच्या पटलावर कुटे यांचा सहभाग सध्या फारसा दिसत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये बेचैनी आहे. अशातच त्यांनी गायलेले “..पर झोली खाली” हे भजन केवळ साईभक्तीचे प्रतीक होते की मनातील भावनांची अभिव्यक्ती हे येणारा काळच ठरवेल !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT