IAS Transfers : फडणवीस सरकारकडून दिवाळीनंतर प्रशासनात मोठी उलथापालथ; सात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

Maharashtra News: एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची दिवाळीनंतरची पहिलीच बैठक वादळी ठरली असताना दुसरीकडे प्रशासनातून मोठी अपडेट समोर आली आहे.
Maharashtra IAS officer transfer .jpg
Maharashtra IAS officer transfer .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची दिवाळीनंतरची पहिलीच बैठक वादळी ठरली असताना दुसरीकडे प्रशासनातून मोठी अपडेट समोर आली आहे.महायुती सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर मोठी उलथापालथ सुरू आहे.

गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून राज्यात सातत्यानं वरिष्ठ आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सुरू आहे.याचदरम्यान,आता राज्य सरकारनं पुन्हा एकदा सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Transfer)केल्या आहे.

राज्य सरकारकडून (State Government) मंगळवारी (ता.28) सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढले आहेत. सरकारनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच मंत्रालय आणि पुणे महानगरपालिका आणि इतर विभागांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. एकूण सात आयएएस अधिकाऱ्यांच्या नवीन विभागात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी :

1. संजय खंदारे (Sanjay Khandare IAS :RR:1996) प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. पराग जैन नैनुतिया (Parrag Jaiin Nainutia IAS :RR:1996) प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Maharashtra IAS officer transfer .jpg
Sangli BJP: पालकमंत्री चंद्रकांतदादांनी टाकलेल्या नव्या बॉम्बमुळे सांगली भाजपमध्ये खळबळ; इच्छुकांची झोप उडाली

3. कुणाल कुमार (Kunal Kumar IAS :RR:1999) यांना शिवशाही पुनर्वसन प्रकल्प,मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. वीरेंद्र सिंह (Virendra Singh IAS :RR:2006) सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. ई. रावेंदिरन (E.Ravendiran IAS:RR:2008) मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई यांना सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6. एम.जे. प्रदीप चंद्रन (M.J.Pradeep Chandran IAS :RR:2012) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे यांना प्रकल्प संचालक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

7. पवनीत कौर (Pavneet Kaur IAS :RR:2014) उपमहासंचालक, यशदा, पुणे यांना महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com