Sangli BJP: पालकमंत्री चंद्रकांतदादांनी टाकलेल्या नव्या बॉम्बमुळे सांगली भाजपमध्ये खळबळ; इच्छुकांची झोप उडाली

Sangli News: सांगली महापालिकेतील राजकारण पाहिले तर सत्ता भाजपची असली तरी नंतरच्या काळात फितुरीमुळे ही महापौर आणि उपमहापौर पदाची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेले. त्यामुळे सांगलीकर ही संभ्रमा अवस्थेत पडले.
Chandrakant Patil On Home Ministery
Chandrakant Patil On Home Ministerysarkarnama
Published on
Updated on

Sangli News: सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेमुळे भाजपमधील नव्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. मंत्री पाटील यांनी जुन्यांना पुन्हा उमेदवारीचा शब्द दिल्यानंतर गेल्या अनेक दोन अडीच वर्षांपासून सांगली महापालिकेसाठी तयारी करत असलेल्या कार्यकर्त्यांंमध्ये मात्र नाराजी आहे.

त्यासोबत महायुतीमधील घटक पक्षात देखील मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या भूमिकेमुळे नाराजीचे मानसिकता तयार झाली आहे. भाजपमध्ये जागा उरल्यास तरच महायुतीतील इतर पक्षांचा विचार केला जाईल, असे विधान आल्यानंतर महायुतीमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

मागील काही दिवसांमध्ये राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्याचे दौरे वाढवले आहेत. दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या घरी भेट दिली. यावेळी अनेकांचा पक्षप्रवेश झाला.

सांगली महापालिकेच्या निवडणुकीत जे काँग्रेसमध्ये होते आणि मागील निवडणुकीत ते अपक्ष लढले. त्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांनी भाजपला (BJP) पाठिंबा दिला. आता पुढील निवडणुकीत देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आशा माजी नगरसेवकांना उमेदवारी संदर्भात सुचवाच केल्यानंतर नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांचे आतापासूनच खच्चीकरण झाले आहे.

Chandrakant Patil On Home Ministery
Omraje Nimbalkar Vs Ranajgajitsinh Patil: एकमेकांची 'लायकी' काढत पुन्हा एकदा भाजप आमदार अन् उद्धव ठाकरेंचा खासदार भिडला

सांगली महापालिकेतील राजकारण पाहिले तर सत्ता भाजपची असली तरी नंतरच्या काळात फितुरीमुळे ही महापौर आणि उपमहापौर पदाची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेले. त्यामुळे सांगलीकर ही संभ्रमा अवस्थेत पडले. अशा परिस्थितीत गोंधळाचे वातावरण तयार झाले असताना पुन्हा एकदा भाजपमधीलच इच्छुकांच्या पालकमंत्रींच्या या भूमिकेमुळे गोंधळात भर पडली आहे.

शिवाय भाजपमधील इच्छुकांच्या उमेदवारीची जागा पूर्ण झाल्यास इतर महायुतीतील पक्षांचा विचार केला जाईल, असे सुतोवाच केल्यानंतर घटक पक्षात देखील संभ्रमाचे वातावरण आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे किती जागा देणार याबाबत देखील स्पष्टता नाही.

Chandrakant Patil On Home Ministery
NCP News : अजित पवार काँग्रेसचा अख्खा मतदारसंघच रिकामा करणार : एकाच वेळी दोन दिग्गज माजी मंत्र्यांना धक्का

शिवाय जनसुराज्य शक्तीचे समित कदम हे भाजप सोबत प्रामाणिक असले तरी पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज नाही. त्यामुळे भाजपसोबत महायुतीतील इच्छुक देखील गोंधळले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com