Ashok Karanjkar, Devendra Fadanvis & Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: एकनाथ शिंदे यांच्या नाशिकच्या लाडक्या आयुक्तांवर भाजपची वक्रदृष्टी?

Ashok Karanjkar Land Acquisition Controversy : नाशिक महापालिकेचे मावळते आयुक्त अशोक करंजकर यांच्या विरोधात भाजप नेत्यांची मोर्चे बांधणी

Sampat Devgire

Nashik News: भूसंपादन प्रकरणातील संशयास्पद व्यवहार मावळते आयुक्त अशोक करंजकर यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. त्यासाठी आता भाजपच्या नेत्यांनीच कंबर कसली आहे.

नाशिक महापालिकेकडून सातत्याने बांधकाम व्यवसायिकांच्या हिताची भूमिका घेतली जाते. बांधकाम व्यवसायिकांना लोणी आणि गरजू आणि नागरिकांना धपाटा अशी वागणूक प्रशासनाकडून मिळत आली आहे. त्यावर अशोक करंजकर यांच्या कारकीर्दीत कळस गाठला होता, अशी तक्रार आहे. त्याची आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे.

मोजक्या ११ बांधकाम व्यवसायिकांना एका रात्रीत ५५ कोटी रुपयांचा निधी आयुक्त करंजकर यांनी वर्ग केला. त्याचवेळी उच्च न्यायालयाचे विविध निर्देश असतानाही शेतकरी मात्र वंचित राहिले. गेल्या वीस वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या नाशिक महापालिकेने त्यांना दमडीही दिलेली नाही. त्यामुळे असंतोष टोकाला पोहोचला आहे.

या संदर्भात शेतकरी कृती समितीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते उद्धव निमसे यांनी यासंदर्भात विविध संदर्भ आणि माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच महापालिके विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्त करंजकर यांच्या अडचणी आणखी वाढणार.

यापूर्वी आमदार राहुल ढिकले यांनी भूसंपादनाच्या ५५ कोटी रुपयांच्या धनादेश वितरणाबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याची दखल घेतली. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी अशोक करंजकर यांची आयुक्तपदी नियुक्ती केली होती. ते एकनाथ शिंदे यांचे आवडते अधिकारी असल्याची चर्चा होती. याच एकनाथ शिंदे यांच्या आवडत्या अधिकाऱ्यावर आता भाजपची मात्र वक्रदृष्टी पडली आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामध्ये आयुक्त करंजकर हे अडचणीत येणार, हे मात्र नक्की. त्या निमित्ताने नाशिक महापालिकेचा कारभारही चर्चेत आला आहे.

नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी या कार्यभार घेतल्यावर आपला प्रभाव दाखविण्यासाठी विविध पावले टाकली आहेत. त्याचा अधिकाऱ्यांनाही फटका बसत आहे. त्या दृष्टीने नाशिक महापालिकेत पत्ते पिसले जाणार असा संदेश गेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT