Congress Politics: काँग्रेस शहराध्यक्षांची खासदारांना गुगली, दोन लाख मते दिली, ‘ आता काम दाखवा’

Malegaon Congress : मालेगाव शहरातील काँग्रेस शहराध्यक्षांचा खासदार बच्छाव यांना प्रश्न
Ejaj Beig | Dr Shobha Bacchav
Ejaj Beig | Dr Shobha BacchavSarkarnama
Published on
Updated on

Congress News: मालेगाव शहर आणि राजकारण अतिशय क्लिष्ट असते. याची जाणीव आता काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांनाही होऊ लागली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ बच्छाव यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव पहिल्यांदाच मालेगाव शहरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. शहराच्या विविध प्रश्नांवर त्यांनी पदाधिकाऱ्यांची संवाद साधला.

Ejaj Beig | Dr Shobha Bacchav
MP Shobha Bachhav : हा तर किरीट सोमय्या यांचा धंदाच, खासदार शोभा बच्छाव यांचा निशाणा

यावेळी काँग्रेसच्या ग्रामीण भागातील नेत्यांनी उपस्थिती दर्शविली. मात्र मालेगाव शहरातील पदाधिकारी आणि अध्यक्ष त्याकडे फिरकलेच नाही. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. या विषयावर छेडले असता शहर अध्यक्ष एजाज बेग यांनी वेगळाच सूर आळवला.

Ejaj Beig | Dr Shobha Bacchav
Devendra Fadnavis: ‘बिल्डरांचे हित’ आयुक्त करंजकरांना भोवणार, मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये!

मालेगावच्या जनतेने काँग्रेसच्या डॉ बच्छाव यांना दोन लाख मते दिली. त्यामुळे हा मतदारसंघ देशभर चर्चेत आला आहे. देशभरातील राजकीय नेते, नागरिक हा कोणता मतदारसंघ आहे, अशी चर्चा करतात. भाजप साठी राजकीय विषय आहे.

निवडणुकीला आता वर्ष होत आले आहे. ही चर्चा बाजूला ठेवून काय काम केले? शहराचे कोणते प्रश्न सोडवले? हे खासदारांनी पुढे येऊन सांगितले पाहिजे, अशी गुगली थेट काँग्रेसच्या शहराध्यक्षानेच टाकली. त्यामुळे स्थानिक गटबाजीच्या माध्यमातून खासदार डॉ बच्छाव यांना पक्षातूनच घरचा आहेर मिळाला आहे.

शहराध्यक्ष बेग यांनी पक्षातील गटबाजी विषयी देखील सूचक वक्तव्य केले. खासदार शहरात येणार याची आपल्याला साधी कल्पनाही देण्यात आली नव्हती. युसुफ नॅशनल वाले आणि इन्कलाब मुकादम हे दोन भाऊच त्यांची सगळी कामे पाहतात, असा टोमणा त्यांनी मारला.

शहरातील भुयारी गटार योजना आणि कचरा उचलण्याचे कंत्राट यावरून सध्या महापालिकेच्या प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. या संदर्भात खासदार डॉ बच्छाव यांनी महापालिकेला पत्र देऊन हे काम थांबविण्याची विनंती केली होती. मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही.

याबाबतही काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी स्वतःच्याच पक्षाच्या खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. एकंदरच मालेगावमध्ये विधानसभेत अनामत गमावलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना अद्यापही जाग आलेली दिसत नाही. त्यामुळे आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर एकोप्याने काम करण्याऐवजी स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांवर टीका करण्याची चढाओढ लागल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com