MP Shobha Bachhav : हा तर किरीट सोमय्या यांचा धंदाच, खासदार शोभा बच्छाव यांचा निशाणा

Shobha Bachhav Criticize Kirit Somaiya : काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी भाजपच्या सोमय्या यांना चांगलेच सुनावले
MP Shobha Bachhav |Kirit Somaiya
MP Shobha Bachhav | Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Congress News : भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. विरोधकांवर आरोप करून त्यांना नामोहरम करणे हा त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्यांच्या टार्गेटवर मालेगाव शहर आहे. मात्र हा डाव उलटा पडण्याची चिन्हे आहेत.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वोट जिहाद वरून मालेगाव शहराला आपले टार्गेट केले आहे. त्यासाठी त्यांनी भरमसाठ आरोप देखील केले. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला.

MP Shobha Bachhav |Kirit Somaiya
Shrirampur News : काँग्रेस आमदाराची आरटीओ कार्यालयात 'गांधीगिरी'; अधिकारीही झाले 'खजील'!

या संदर्भात शंभर कोटी रुपये मालेगाव शहरात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत त्यांनी विविध बँकांच्या खात्यांचा संदर्भात दिला. मात्र हे आरोप झाल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न कायम आहे. सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार काहीही आढळले नसल्याचा दावा खाजगीत पोलिसांनी केल्याची चर्चा आहे.

MP Shobha Bachhav |Kirit Somaiya
Devendra Fadnavis: ‘बिल्डरांचे हित’ आयुक्त करंजकरांना भोवणार, मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये!

या संदर्भात शंभर कोटी रुपये मालेगाव शहरात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत त्यांनी विविध बँकांच्या खात्यांचा संदर्भात दिला. मात्र हे आरोप झाल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न कायम आहे. सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार काहीही आढळले नसल्याचा दावा खाजगीत पोलिसांनी केल्याची चर्चा आहे.

याबाबत काँग्रेसच्या खासदार डॉ बच्छाव यांनी सोमय्या यांना चांगलेच फटकारले आहे. त्या म्हणाल्या, भाजप नेते सोमय्या मालेगाव शहराची बदनामी करीत आहेत. त्यामागे त्यांचा काय हेतू आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भाजप सातत्याने विशिष्ट लोकांना टार्गेट करून त्यांना त्रास देते हे आता उघड झाले आहे.

वोट जिहादच्या नावाखाली मालेगाव शहराला बदनाम करणे हा सोमय्या यांचा उद्देश आहे. यातून खोटे नॅरेटिव्ह सेट करून विशिष्ट लोकांना त्रास देण्याचा सोमय्या यांचा धंदा आहे, अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी सोमय्या यांना फटकारले आहे.

जाती धर्मात तेढ निर्माण करून सोमय्या वेगळ्याच हेतू घेऊन मालेगावला येत असावेत. ज्या नागरिकांकडे जन्माचे पुरावे आहेत शासनाच्या नियमानुसार आवश्यक कागदपत्र आहेत. अशा लोकांनाच प्रशासन जन्म दाखला देते. प्रशासन आणि संबंधित अधिकारी खोटे काम कसे करतील?. केले असेल तर, सोमय्या यांच्याकडे पुरावा असायला हवा असे खासदार बच्छाव म्हणाल्या.

सोमय्या यांच्याकडे कोणताही पुरावा नसताना ते विशिष्ट लोकांना टार्गेट करीत आहेत. भाजप या माध्यमातून शहरात दहशत व भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सीबीआय कडे जावे, या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करावी, असे आव्हान त्यांनी दिले.

भाजपचे माजी खासदार सोमय्या नुकतेच मालेगावच्या दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. या सर्व आरोपांची `एमआयएम`चे स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी चिरफाड केली. त्यामुळे सोमय्या यांच्या आरोपात राजकारण किती आणि तथ्य किती हा चर्चेचा विषय बनला.

यानिमित्ताने भाजप नेते किरीट सोमय्या यांना काँग्रेसच्या खासदार डॉक्टर बच्छाव यांनी थेट आव्हान दिले आहे. माजी खासदार सोमय्या सातत्याने सणसणाटी निर्माण करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. यंदा मात्र मालेगाव मधून त्यांना थेट आव्हान मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com