Nashik News : "गेल्या आठवड्याभरात राज्यभरात घडलेल्या हत्या आणि गोळीबाराच्या घटना व त्याला सत्ताधारी गटाकडून असलेले प्रत्यक्ष-अप्रत्यक्षणे प्रोत्साहन अतिशय घातक आहे. यातून राज्यात विरोधी पक्षांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. याची जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे," अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. (Latest Marathi News)
ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार करून केलेली हत्या आणि शिवसेना नगरसेवकावर झालेल्या गोळीबार यातून गुंड आणि गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक पूर्णतः नष्ट झालेला आहे. याची कबुली खुद्द वरिष्ठ पोलीस अधिकारी देत आहेत. त्यामुळे नैतिकतेच्या गप्पा मारणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा दिला. पाहिजे ते कसली वाट पाहत आहेत, असा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे गृहमंत्र्यांचा निषेध करीत सटाणा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला मारून त्यांचा निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार संजय चव्हाण यांनी भाजपवर टीका केली. "ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. पुणे येथे असीम सरोदे, पत्रकार निखिल वागळे आणि अन्य विचारवंतांवर झालेला हल्ला हा थेट भारतीय जनता पक्षाचा सहभाग असलेला आहे. अतिशय भयानक प्रकार म्हणून लोकशाहीत त्याची गणना होईल. फडणवीस यांनी थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर ताबडतोब राजीनामा दिलाच पाहिजे. भाजप एवढ्या विकृत स्तराला जाईल याची जनतेला देखील कल्पना नसावी, असे चव्हाण म्हणाले.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, डॉक्टर प्रशांत सोनवणे, रवींद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे केशव मांडवडे, साहेबराव सोनवणे, काँग्रेस पक्षाचे अनिल पाटील, किशोर कदम, मनोज सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
(Edited By - Chetan Zadpe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.