Devendra-Fadanvis-Ajit-Pawar.jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics: राज्य शासन कुंभमेळ्याबाबत उदासीन? पालकमंत्र्यांचा विषय पुन्हा रखडला!

Devendra fadnavis; Eknath Shinde refuses to give up, controversy over Nashik's Guardian Minister post continues-नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीचा वाद राजकीय साठमारीत अडकला

Sampat Devgire

BJP- Shivsena News: गेले महिनाभर राज्यात विविध घटना राजकीय चर्चेचा विषय बनला. यामध्ये सातत्याने महायुतीचे सरकार अडचणीत आले. त्यामुळे काही प्रमाणात सरकार बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक चांगले निर्णय बाजूला पडले.

या वादात नाशिकच्या पालकमंत्री पदाचा विषय बाजूला पडला आहे. यासंदर्भात सिंहस्थ कुंभमेळा हा प्रमुख विषय आहे. कुंभमेळ्याच्या तयारीच्या विविध बैठका झाल्या यामध्ये सर्वात आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची तसेच आखाडा परिषदेच्या साधूंची बैठक घेतली.

कुंभमेळ्यांच्या या बैठकांनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचा दौरा केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या आराखड्या संदर्भात चर्चा करून बैठक घेतली. कुंभमेळ्याच्या आराखड्याला तातडीने मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळा मंत्री म्हणून जलसंपदा मंत्री महाजन यांचे नियुक्ती करणार असल्याचे संकेत दिले होते. राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. त्या यादीत नाशिकला गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र तो निर्णय औटघटकेचा ठरला.

सिंहस्थ कुंभमेळा हा प्रशासकीय तयारीच्या दृष्टीने सध्या तातडीचा विषय आहे. पालक मंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे प्रशासकी स्तरावर अधिकाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः सिंहस्थ कुंभमेळ्याचा अंतिम आर्थिक आराखडा अद्याप जाहीर झालेला नाही. हा कुंभमेळ्यातील सर्वात मोठा अडथळा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी झालेल्या अवमानकारक भाषेचा वापर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या उपचाराला नकार, यापासून तर विविध घटना घडल्या आहेत. त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. या संदर्भात महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी यावर राजकीय विधाने केल्याने महायुती सरकार त्यात गुरफटले. त्यामध्ये नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा वाद बाजूला पडला. आता त्यावर केव्हा निर्णय होतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT