Manikrao Kokate, Girish Mahajan & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics: देवाभाऊंची गिरीश महाजन यांना चाल, अजित पवार यांना धक्का!

Devendra Fadnavis;Nashik Girish Mahajan gets a slap from Fadnavis against NCP and Eknath Shinde-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिला मेसेज

Sampat Devgire

Devendra Fadnavis News: अपेक्षेप्रमाणे नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा तिढा फडणवीस यांनी न बोलता सोडविला आहे. भाजपने नाशिक आपल्याकडेच ठेवत महायुतीच्या दोन्ही पक्षांना मेसेज देण्याचे काम केले आहे.

नाशिकच्या पालकमंत्री पदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती कायम राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीनंतर तसेच स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद आता कसा सुटतो, हे सर्वस्वी महायुतीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांवर अवलंबून आहे.

सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाविषयी चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने विविध जबाबदाऱ्या आणि कामानबाबत सूचना व चर्चा यात गिरीश महाजन यांना प्राधान्य देण्यात आले होते.

या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असतील, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार आहेत. त्याचबरोबर नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे दोन मंत्री आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला संख्याबळाच्या आधारे नाशिकचे पालकमंत्री पद आपल्याकडेच ठेवायचे होते.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी वारंवार मुख्यमंत्री आणि महायुतीच्या घटक पक्षांना संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीमध्ये नाशिकला गिरीश महाजन आणि रायगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आदिती तटकरे यांचे नाव जाहीर झाले होते. मात्र या दोन्ही जिल्ह्यांवर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षाने दावा केला होता. यापूर्वी दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते.

त्यामुळे त्यांनी यंदाही घोषणा होण्याच्या आधीच महापालिकेसह विविध बैठका घेऊन शिवसेना शिंदे पक्षाचा दावा बळकट करण्याचा प्रयत्न केला होता. घोषणा झाल्यावर देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव नाशिक आणि रायगडच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती.

यावरून महायुतीत प्रचंड राजकीय ओढाताण सुरू होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकचे पालकमंत्री महाजन असतील असे संकेत दिले आहेत. यातून त्यांनी महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांना देखील संदेश दिला आहे. रायगडचे पालकमंत्री पद सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडे आहे. तेथे पालकमंत्री कोण? हा विषय देखील उपमुख्यमंत्री पवार यांच्यावरच सोपविण्यात आल्याचे बोलले जाते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT