Uddhav Thackeray vs Eknath Shinde : ठाकरे-शिंदेंचे शिवसैनिक भिडले; भाजप मंत्री विखेंच्या मतदारसंघात तणाव

ShivSena Uddhav Thackeray Eknath Shinde clashed Ahilyanagar Rahata Neelam Gorhe Sanjay Raut : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता इथं उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.
Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Workers Clash : अहिल्यानगर जिल्ह्याचे भाजप मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राहाता तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात आमने-सामने आल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

नीमल गोऱ्हे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध दोन्ही गटांकडून आंदोलन करण्यात आल्याने हा तणाव निर्माण झाला होता. राहाता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत निवेदन स्वीकारल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) राहाता तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात आंदोलन पुकारले होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील पद वाटपावर गंभीर आरोप केले होते. त्यावर संजय राऊत यांनी झोंबणारी प्रतिक्रिया दिली होती. त्याच्या निषेधासाठी शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्ते आज एकत्र आले होते.

25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Radhakrishna Vikhe : मंत्री विखेंचा त्रिवेणी संगमावरचा भगवेवस्त्रधारी पेहराव...

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात आंदोलन होत असून, त्यांच्या प्रतिमेला चपलेचा हार घालणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. शिंदेसेनेचे पदाधिकारी करत असलेल्या आंदोलनस्थळी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी धाव घेतली. ठाकरे अन् शिंदेसेनेचे पदाधिकारी आमने-सामने आल्याने आंदोलनस्थळी चांगलाच गोंधळ उडाला.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Ujjwal Nikam And Jitendra Awhad : उज्ज्वल निकम ज्यांच्याविरोधात लढणार, ते मंत्रिमंडळात, भाजपच्या जवळचे; जितेंद्र आव्हाडांच्या मनात शंकेची पाल चुकचुकतेय!

दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. दोन्ही बाजूचे शिवसैनिक आमने-सामने आल्याने राहाता शहरात त्याची माहिती पसरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राहाता पोलिसांनी आंदोलनस्थळी येत, तणावावर नियंत्रण मिळवले. आंदोलनकर्त्यांचे बाजू समजावून घेत निवेदन स्वीकारले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दम भरला अन् अनुचित प्रकार घडल्यास गुन्हे दाखल करण्याची सज्जड इशारा दिला. यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शांत झाले.

राऊतांविरोधात कारवाईची मागणी

शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नीमल गोऱ्हे यांच्या आमच्या नेत्या आहेत. त्यांच्याविषयी संजय राऊत यांनी असंसदीय भाषा वापरली. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.

गोऱ्हेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

ठाकरे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे, नीमल गोऱ्हे यांना गद्दार म्हणत, शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीवर हात ठेवून शपथ घ्यावी, असे आवाहन केले. हे खरं निघाले, तर आम्ही सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या सावलीला जाऊन उभं राहू. खोटं निघाल्यास आमच्या महिला शिवसैनिक सडेतोड उत्तर देतील, असा इशारा दिला. एकनाथ शिंदेंचा लवकरच फुगा फुटणार नाही. त्यावेळी ते देखील मातोश्रीच्या सावलीला येऊन उभे राहतील. राहाता पोलिसांकडे नीलम गोऱ्हेंविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केल्याचे ठाकरेंच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com