Devidas Pingle
Devidas Pingle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

देविदास पिंगळे यशस्वी; बाजार समिती निवडणुकीचा मार्ग खुला

Sampat Devgire

नाशिक : सहकार विभाग (Co-operative Department goven extension for election) आणि राज्य शासन (State Government) यांच्यात प्रशासक की मुदतवाढ यामध्ये माजी खासदार देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीस (Nashik APMC) राज्य शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत बाजार समितीची निवडणूक (Election will declare) जाहीर होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी संबंधित विभागासह व जिल्हा उपनिबंधक व सर्व बाजार समित्यांना परिपत्रक पाठविले आहे. यामुळे निवडणूक प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीस दोनवेळा सहा-सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. गेल्या महिन्यात १९ ऑगस्टलाच ही मुदतवाढ संपुष्टात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळास आणखी मुदतवाढ मिळावी, यासाठी मंडळाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज केला होता.

उपनिबंधक कार्यालयाने हा अर्ज पुढील कारवाईस्तव पणन मंडळाकडे पाठविला होता. त्यावर राज्य शासनाने कोरोना प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसल्याचे सांगत बाजार समितीला पुन्हा एकदा २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या स्वरूपाचे आदेश सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांच्या स्वाक्षरीने निघाले आहेत. नाशिक बाजार समितीलाही हे आदेश प्राप्त झाले आहेत. दरम्यान, या आदेशाच्या प्रती महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिव, पणन संचालक पुणे, कार्यकारी संचालक कृषी व पणन मंडळ, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय सहनिबंधक, सर्व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व सर्व बाजार समित्यांच्या सचिवांना पाठविण्यात आल्या आहेत. यामुळे पुन्हा निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत.

सर्वच चर्चांना ‘ब्रेक’

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास दिलेली मुदतवाढ संपताच प्रशासक नियुक्ती करावी आणि निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेश गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. बाजार समितीप्रकरणी दाखल याचिकेवरील सुनावणीत दोनच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक बसण्याच्या चर्चेला आणि निवडणूक प्रक्रियेला तूर्तास ब्रेक लागला आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT