Dhananjay Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhananjay Munde : गंभीर आरोपांनी घायाळ झालेल्या मुंडेंनी अखेर पलटवार केलाच; म्हणाले, मला काय बदनाम करायचं ते करा,पण...

Shirdi NCP Adhiveshan : संतोष देशमुख हत्येप्रकरणात गंभीर आरोप, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन पत्ताकट ,या सगळ्या घडामोडीनंतर अखेर शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिराला हजर राहणार नाही अशी चर्चा सुरु असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी (ता.19) शिर्डीत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी बीडमधील विरोधकांच्या टीकेला जोरदाप प्रत्युत्तर दिले.

Pradeep Pendhare

Shirdi News : "बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटातील 'मकोका' लावलेला वाल्मिक कराड यांच्याबरोबर कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचा दावा करत, सध्याच्या बीडमधील परिस्थिती विरोधकांच्या अविचारी विरोधामुळे आहे. मला काय बदनाम करायचे ते करा. परंतु बीड जिल्ह्याला बदनाम करू नका", अशी विनंती मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी केली.

मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिराला हजेरी लावली. दरम्यान काल राज्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्ती जाहीर झाल्या होत्या. यात मंत्री धनंजय मुंडे यांना संधी मिळाली नाही. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीडमधील (Beed) संतोष देशमुख हत्येचे प्रकरण गाजत आहे.

या हत्येच्या कटात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय 'मकोका'मधील आरोपी वाल्मिक कराड अटकेत आहेत. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यात. महायुतीमधील भाजप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश साळुंके यांनी बीडमधील हत्येचे प्रकरण उचलून धरले आहे. यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती अडचणी वाढल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारली आहे. यावर बोलताना मंत्री मुंडे म्हणाले, "बीडची सध्याची स्थिती पाहून मीच अजितदादांना विनंती केली होती. बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी. जसा पुण्याचा विकास झाला, तसा बीडचाही व्हावा. ही माझी भावना आहे".

विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना मंत्री मुंडे यांनी त्यांच्या मागणीपेक्षा माझी भावना काय हे महत्वाचं. मी पक्ष नेतृत्वाला विनंती केली. बीडची जबाबदारी आपण घ्यावी. त्यांनी ती स्वीकारली. यातच सर्व काही आले, असेही म्हणाले.

बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका

'विरोधकांनी माझ्यावरचा एक तरी आरोप खरा करून दाखवावा. मला आत्ता यावर काही बोलायचं नाही. वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही. आत्ताची परिस्थिती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा व्यवस्थित व्हायला हवा. मला बदनाम करायचंय, तर करा. मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका", अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली.

आर्थिक हितसंबंधांचे आरोप खोटे

हत्येच्या गुन्ह्याच्या कटातील आरोपी वाल्मिक कराड याच्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि स्थावर मालमत्ता समोर येत आहे. यातून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधत आहेत. त्याबाबत बोलताना मंत्री मुंडे म्हणाले की, "वाल्मिक कराड याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप खोटे आहेत".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT