Girish Mahajan politics: पालकमंत्री गिरीश महाजन यांचे पहिले टार्गेट "मिशन मालेगाव"

Girish Mahajan; Mahajan support killed Somaiya political line for Malegaon-भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव येथील अवैध आणि बांगलादेशी नागरिकांबाबत आरोप केले होते.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Politics: भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी गेले काही दिवस मालेगाव हा विषय चर्चेत ठेवला होता. पालकमंत्र्यांची नियुक्ती आता झाली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही त्याच दिशेने मार्गक्रमण करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात मालेगाव येथील अवैध कागदपत्रांच्या आधारे रहिवास असलेल्यांवर कारवाई करणार, असे स्पष्ट केले आहे. या संदर्भात गृह खात्याने एक विशेष चौकशी समिती नियुक्त केली आहे. ही "एसआयटी" तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Girish Mahajan
Sunil Tatkare On Uttam Jankar : '...तर तिथं महायुतीचा आमदार निवडून येत असतो'; तटकरेंनी जानकरांना डिवचलं

मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य या दोन मतदारसंघात या रहिवासी यांचे वास्तव्य असल्याचे बोलले जाते. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तीन वेळा मालेगावला भेट दिली आहे. मालेगाव शहरात याबाबतचे रॅकेट सक्रिय असल्याचा दावा त्यांनी केला होता.

Girish Mahajan
Ahliyanagar Guardian Minister: मंत्रिमंडळात दुय्यम खातं, 'डिमोशन'ची चर्चा, अखेर ताकद पणाला लावून विखेंनी पुन्हा पालकमंत्रिपद आणलंच!

यामध्ये मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेटच्या माध्यमातून अवैध निधी पुरविला जातो. यातील जवळपास २०० कोटी रुपये वाटप झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. त्याचा वारंवार पुमरूच्चार त्यांनी केला होता. त्यामुळे मालेगाव शहर हे भाजपसाठी हे राजकीय मिशन असल्याचे लपून राहिलेले नाही.

यामध्ये अवैध व नियमबाह्य जन्म दाखले वितरीत झाल्याचा त्यांचा दावा होता. महापालिका आणि तहसीलदार कार्यालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी हे जन्मदाखले वाटल्याचे त्यांनी म्हटले आहे. मालेगाव महापालिकेने जवळपास एक हजार दाखले दिले. ते सर्व बनावट असल्याचा त्यांचा दावा होता. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी सोमय्या यांची मागणी होती.

आता पालकमंत्री पदाचा कार्यभार गिरीश महाजन यांनी स्वीकारला आहे. त्यांनी मालेगाव शहर आणि लगतच्या परिसरातील अवैध कागदपत्रांच्या आधारे राहणाऱ्या घुसखोरांना लक्ष्य करणार आहेत. याबाबत प्रशासनातील काही लोक देखील त्यांना मदत करतात असा त्यांचा आक्षेप आहे.

या रहिवासीयांना दिल्या जाणाऱ्या कागदपत्रांचा उगम काय आणि त्यामागे कोण कार्यरत आहे. याचा शोध घेतल्या जाणाऱ्या अवैध घुसखोरी झाल्यास त्यांना तातडीने हाकलून देण्यात येईल, असा थेट इशाराच पालकमंत्री महाजन यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात मालेगाव अर्थात नाशिक हे भाजपच्या राजकीय अजेंडा म्हणून महत्त्वाचे केंद्र असेल, असे संकेत आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com