Shivsena Shinde agitation & Ajay Boraste Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: महायुतीचे घटक पक्षच धनंजय मुंडेंच्या विरोधात, वाल्मीक कराडला दिली प्रतिकात्मक फाशी!

Dhananjay Munde;Shiv Sena Shinde party protests, symbolic hanging of Valmik Karad-शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून बीड प्रकरणाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आंदोलन

Sampat Devgire

Eknath Shinde News: मस्साजोगचे (बीड) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहे. नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून या विषयावर आंदोलन झाले.

विशेष म्हणजे महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात गेले आहेत. बीडमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस या संदर्भात जनजागृती करीत आहे. नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे शहरातील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी बीड प्रकरणात झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध करण्यात आला. या हत्येच्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड याला प्रतीकात्मक फाशी देण्यात आली.

मस्साजोग सरपंच देशमुख याची हत्या अतिशय संतापजनक आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारीला कधीही पोलिसांकडून सूट मिळता कामा नये. पोलिसांनी याबाबत गंभीर कारवाई केली पाहिजे. हे आंदोलन कुठल्याही पक्षाच्या विरोधात नसून गुन्हेगारी विरोधात आहेत. राज्यात घडणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारीचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले.

संतोष देशमुख हत्याप्रकरणीतील व्हिडिओ तसेच फोटो काल समाज माध्यमांवर सगळीकडे व्हायरल झाले. त्यावर अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राज्याच्या अनेक भागात त्याचा निषेध नोंदवत आंदोलन झाले. नाशिक शहरातही अशाच प्रतिक्रिया उमटल्या. खंडणी आणि गुन्हेगारी यामध्ये राजकीय सहभाग म्हणून त्याकडे पाहिले जाते. याबाबत मंत्री मुंडे यांच्यावरही टीका करण्यात आली.

यावेळी उपनेते बोरस्ते, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. सुदाम ढेमसे, शामकुमार साबळे, शिवाजी भोर, दिगंबर मोगरे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, रोशन शिंदे यांचं विविध पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

बीड प्रकरणावरून महायुतीच्या विरोधात राजकीय वातावरण पेटविण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र सध्या महायुतीतील घटक पक्षच बीड प्रकरणावरून आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिकमधील हे आंदोलन सामान्यांसाठी चर्चेचा विषय ठरले.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT