Kiran Kale Shisena UBT Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dheerajsinh Rajput murder : धीरजसिंह राजपूत हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत? मुख्य सूत्रधाराला पकडा, शिवसेनेने अहिल्यानगरच्या गुन्हेगारीकडे 'DGP'चे वेधले लक्ष

Kiran Kale demands a probe into the Dheerajsinh Rajput murder case and immediate arrest of absconding accused and the alleged mastermind : शिवसेना ठाकरे पक्षाचे किरण काळे यांचे पोलिस महासंचालकांना निवेदन; CCTV, कॉल रेकॉर्ड, डिजिटल आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी

Pradeep Pendhare

Ahilyanagar crime news : अहिल्यानगरमधील धीरजसिंह राजपूत हत्या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून फरार आरोपींसह मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहर महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक यांना लेखी निवेदन दिले आहे.

धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास केवळ प्रत्यक्ष आरोपींपुरता मर्यादित न ठेवता, या गुन्ह्यामागील पूर्वनियोजन, कटकारस्थान आणि आरोपींचे परस्पर संपर्क यांचाही तपास करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) किरण काळे यांनी केली.

या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींना तातडीने अटक करण्याबरोबरच हत्येमागील (Crime) मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यालाही कायद्याच्या कक्षेत आणावे, असे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर वैज्ञानिक पुरावे यांची सखोल तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तपास जलदगतीने पूर्ण करून सक्षम न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे. तसेच प्रकरणाचा जलदगतीने निकाल लागण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करून ज्येष्ठ आणि अनुभवी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, असेही काळे यांनी म्हटले आहे. अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीवरून किरण काळे यांनी सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. “अहिल्यानगर शहराची मर्डर सिटी होण्यामागे सरकार आणि पोलिस प्रशासनाचे अपयश आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“दोषींना फासावर लटकवा,” अशी मागणी करत सरकारला नागरिकांना संरक्षण देता येत नसेल, तर नगरकरांना स्वतःच्या संरक्षणासाठी बंदुका द्याव्यात, अशी उपरोधिक मागणीही काळे यांनी केली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाने पोलिस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील अलीकडच्या हत्यांच्या घटनांचा संदर्भ देत काळे यांनी, “अजून किती हत्या पहाव्या लागणार?” असा सवाल उपस्थित केला.

श्रीरामपूरमधील हाॅटेल व्यावसायिक हत्येचा संदर्भ

श्रीरामपूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हत्येचा संदर्भ देत काळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हाफ मर्डर, अवैध धंदे आणि ड्रग्स रॅकेट यामुळे जिल्हा पोखरला गेल्याचा आरोप त्यांनी केला. “गल्ली ते दिल्ली एकाच विचारांचे सरकार असतानाही अहिल्यानगर असुरक्षित आहे. अहिल्यानगर महाराष्ट्राचे क्राईम कॅपिटल होण्यामागे सरकारचे अपयश आहे,” असा घणाघात काळे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT