BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Mayor News : धुळ्यात धक्कादायक घटना : बदनामीकारक पोस्ट व्हायरल होताच भाजपच्या महिला महापौरांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; रुग्णालयात उपचार सुरू

Dhule Mayor Maya Pardeshi Social Media Defamation Case : धुळ्याच्या महापौर माया परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

Dhule News : धुळ्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळ्याच्या भाजपच्या महिला महापौर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. महापौर यांनी विष प्राशन केल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोशल मीडियावर होणाऱ्या बदनामीकारक पोस्टला कंटाळून धुळे महानगरपालिकेच्या भाजपच्या महिला महापौर यांनी विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी माहिती दिली असून, या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर महापौर यांच्यासंदर्भात अत्यंत बदनामीकारक मजकूर व्हायरल केला जात होता. यामुळे सततच्या मानसिक त्रासाला आणि बदनामीला कंटाळून महापौरांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विघ्नहर्ता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी संजय शर्मा नावाच्या व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, परिसरात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. तर या घटनेच्या निषेधार्थ आज धुळ्यात मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येत निषेध मोर्चा काढला. या मोर्चात आमदार अनुप अग्रवाल हे देखील सहभागी झाले होते.

महिला लोकप्रतिनिधींची अशा प्रकारे सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या प्रवृत्तींवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी या मोर्चाच्या माध्यमातून केली आहे. या घटनेमुळे धुळ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT