Dhule Politics : धुळे मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदावरून राजकारण तापलं ; १३ नगरसेवकांच्या संख्याबळावर बंटी खोपडे दावेदार

Dhule Municipal Corporation Leader of Opposition Dispute : धुळे महानगरपालिकेच्या प्रलंबित विरोधी पक्षनेतेपदावरून वातावरण तापलं असून १३ नगरसेवकांच्या संख्याबळावर बंटी खोपडे यांनी दावेदारी सांगितली आहे.
Dhule Politics
Dhule PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Dhule Politics : धुळे महानगरपालिकेच्या प्रलंबित विरोधी पक्षनेतेपदावरून सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महापालिकेची निवडणूक होऊन आठ महिने उलटले तरी विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही.

न्यायालयाकडून चार आठवड्यात यासंदर्भात निर्णय घेण्याचे आदेश असून त्या पार्श्वभूमीवर धुळे शहर विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपच्या महापौर मायादेवी परदेशी यांची भेट घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत आणि निवेदन साद केलं. न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्यांच्या मुदतीत निर्णय न झाल्यास न्यायालयीन अवमानाची याचिका दाखल करण्याचा इशारा आघाडीने दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) , एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा गट यांच्या शहर विकास आघाडीचे गटनेते शाहबाज फारूक शाह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेतली. धुळे महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याचा दावा शहर विकास आघाडीने केला आहे.

या नियुक्तीसाठी आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गुणवत्तेच्या आधारावर चार आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे गटनेते शाहबाज फारूक शाह यांनी सांगितले.

Dhule Politics
Nandurbar Politics : शिंदेंच्या आमदाराला अश्रू अनावर, असमान निधी वाटपावरुन खंत ; भर मेळाव्यात दोन मंत्र्यांसमोरच मांडली हतबलता!

दरम्यान, शहर विकास आघाडीकडे १३ नगरसेवकांचे संख्याबळ असून, मनपातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा गट असल्याने दीपक सुरेश ऊर्फ बंटी खोपडे हे विरोधी पक्षनेतेपदाचे योग्य दावेदार असल्याचा दावा आघाडीने केला आहे.

Dhule Politics
Nashik Crime : 15 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष; गोणी उघडताच भोंदूचा भांडाफोड ! पोलिसांनी ठोकल्या बेड्या

निवडणूक होऊन अनेक महिने उलटले तरी विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत आता मनपा प्रशासन आणि माननीय महापौर या पदाबाबत काय अंतिम निर्णय घेतात, याकडे संपूर्ण धुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com