Dhule Drought Politics : धुळ्यात दुष्काळाचे राजकारण पेटले; ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर, भाजप नेते पोहोचले वर्षावर!

Dhule Drought Shiv Sena Prepares Protest : धुळ्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर, भाजपने नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
 Drought
Droughtsarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: धुळे जिल्ह्यात गेल्या 50 दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात टंचाई सदृश्य स्थिती आहे. शेती आणि पिके संकटात सापडली आहेत. धुळे जिल्ह्यातील सर्व मतदार संघांमध्ये सत्ताधारी महायुतीचे आमदार आहेत. जयकुमार रावल हे पालकमंत्री आहेत. अशा स्थितीत दुष्काळाने शेतकरी संकटात सापडल्याने गंभीर पेच निर्माण झाला आहे.

दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन विरोधक सत्ताधारी भाजप विरोधात आक्रमक झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलन सुरू केले आहे. सत्ताधारी भाजपवर शिवसेनेने गंभीर आरोप केले.

पार्श्वभूमीवर सत्तेपासून दुरावलेले माजी आमदार कुणाल पाटील यांना थेट वर्षा बंगला गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. धुळ्यात दुष्काळाची परिस्थिती तीव्र झाल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

एकीकडे पाण्याची टंचाई शेती आणि पिके संकटात असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. ही संधी घेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, निंबा मराठे महानगरप्रमुख धीरज मराठी यांनी शासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रशासनाने पंचनामांची वाट न पाहता थेट प्रती हेक्टरी एक लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना जाहीर करावे अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. पाणी आणि चारा टंचाई गंभीर असल्याने शासनाने तातडीने उपाययोजना करावेत. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

दुष्काळाचे राजकारण तापले

धुळे जिल्ह्यात दुष्काळाचे राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भाजपचे नेतेही मागे नाहीत. माजी आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली तर शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. पार्श्वभूमीवर पालकमंत्री रावल काय भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com