Anil Gote & Arjun Khotkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anil Gote On Arjun Khotkar : ..तर मला अटक करा, अनिल गोटे यांचे खोतकरांना ओपन चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

Amid the Dhule cash controversy, Anil Gote openly challenges Khotkar saying “Then arrest me : अर्जुन खोतकर हे आपल्याला कधीपासून ओळखतात? दर सहा महिन्यांनी पक्ष बदलून बेडूक उड्या मारणाऱ्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा? अशी टीका गोटे यांनी केली आहे.

Ganesh Sonawane

Dhule cash controversy : धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं आहे. खोली क्रमांक 102 मधून तब्बल 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली असून, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी रक्कम जमा करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला आहे. जालना विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार व विधिमंडळ अंदाज समीतीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांनी अनिल गोटे यांचे सर्व आरोप फेटाळून त्यात तथ्य नसून ही त्यांची जुनी सवय आहे असे म्हटले आहे.

दरम्यान गोटे यांनी खोतकर यांना त्यावर प्रत्युत्तर दिले आहे. मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचं आहे, मला अटक करा, असे आव्हानच अनिल गोटे यांनी अर्जुन खोतकर यांना केले आहे. अर्जुन खोतकर हे आपल्याला कधीपासून ओळखतात? दर सहा महिन्यांनी पक्ष बदलून बेडूक उड्या मारणाऱ्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा? अशी टीका गोटे यांनी केली आहे. विश्रामगृहात सापडलेले एक कोटी 84 लाख 84 हजार नेमके कोणाचे आहेत? तुमचा पीए 15 मे पासून त्या ठिकाणी का आलेला होता? असे सवाल गोटे यांनी उपस्थित केले.

दरम्यान या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली. याप्रकरणात शिवसेना नेते आमदार अर्जून खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. परंतु हे प्रकरण आता ईडी आणि सीबीआयकडे देण्याची गरज आहे असं राऊत यांनी म्हटलं आहे.

राऊत म्हणाले , शासनाची विकासकामे योग्य प्रकारे झाली की नाही ते तपासण्याचे काम अंदाज समिती करते. त्यासाठीच अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला. परंतु, धुळे जिल्ह्यात या विकास कामांमध्ये प्रचंड घोटाळे झाले आहेत. त्यातून अर्जून खोतकर यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर 15 कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराने घेतली. गेल्या तीन दिवसांपासून ही रक्कम जमा होत होती. पाच कोटी रुपये जमा झाले होते. उर्वरित 10 कोटी नंतर जमा होणार होते, असे राऊत यांनी म्हटले.

एकूण 29 आमदारांचा समावेश असलेल्या अंदाज समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीची उद्या सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठक होणार आहे. तर समिती आज नंदुरबारच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. मात्र, नंदुरबार येथील बैठक पूर्व नियोजित नसताना देखील समिती नंदुरबारच्या दिशेने रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT