Nashik Rice Scam : नाशिकचा तांदूळ गुपचूप न्यायचे गुजरातला, मोठा धान्य घोटाळा उघड ; राईस मील मालकावर गुन्हा

Nashik government rice scam exposed as rice sold in Gujarat black market : आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेले शासकीय धान (तांदूळ) राइस मिलऐवजी सुरगाणामार्गे गुजरातमध्ये विक्री करून त्याचा अपहार होत असल्याचे महामंडळाच्या चौकशी अहवालात समोर आले आहे.
Rice transport Truck towards Gujrat
Rice transport Truck towards GujratSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेले शासकीय धान (तांदूळ) राइस मिलऐवजी सुरगाणामार्गे गुजरातमध्ये विक्री करून त्याचा अपहार होत असल्याचे महामंडळाच्या चौकशी अहवालात समोर आले आहे. त्यामुळे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी याप्रकरणी पांढुर्ली (ता. सिन्नर)येथील रेणुका राइस मिलचे संचालक राहुल भागवत व ठेकेदार, वाहनचालक सौरभ राऊत यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

आदिवासींच्या विक्री केलेल्या धानावर प्रक्रिया करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने सिन्नर (पांढुर्ली) येथील मे. रेणुका राइस मिलबरोबर करार केला आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभागाने खरेदी केलेले धान्य भरडाईसाठी पांढुर्ली येथील राइस मिलला दिले जाते. मात्र हे धान्य मीलमध्ये जाणे अपेक्षित असताना त्याची परस्पर गुजरात राज्यात विक्री झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राइस मिलबरोबरचा करारनामा रद्द करून ठेकेदाराची बँक गॅरटीही जप्त करण्यासह त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सुरगाण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत संबंधित वाहनांचा पाठलाग करून हा प्रकार उघडकीस आणला होता. यासंदर्भात चौकशी समितीच्या अहवालात तथ्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. पांढुर्ली येथील रेणुका राइस मिलने आदिवासी विकास महामंडळाशी केलेल्या कराराचे उल्लंघन केलं आहे. मीलमध्ये धानाची भरडाई न करता तो तांदूळ थेट गुजरातच्या काळ्याबाजार विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत निष्पन्न झाला आहे.

Rice transport Truck towards Gujrat
Dhule Cash Controversy: पाच कोटींची रोकड; अधिकारी चार तास उशिरा का पोहोचले?... हे आहे गुपित!

आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांनी याप्रकरणी चार सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने पंधरा दिवस या प्रकरणाची चौकशी केली. त्यातून भाताचे ट्रक थेट गुजरातमध्ये काळ्याबाजारात गेल्याचे सिद्द झाले. त्यानुसार लीना बनसोड यांनी भात भरडाई समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र लिहून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने त्याला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. संबंधित ठेकेदाराची बँक गॅंरटीही जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (nashik news)

सुरगाणा येथील महामंडळाच्या गोदामात सर्वांधिक भाताची साठवण आहे. भात भरडाईनंतर 67 टक्के तांदूळ हा पुरवठा खात्याच्या गोदामात जमा केला जातो. 1 मे रोजी सुरगाण्याची सामाजिक कार्यकर्त्यांनी गुजरातच्या काळ्याबाजारात जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला होता. त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं. 28 एप्रिलला निघालेला तांदळाचा ट्रक मिलमध्ये न जाता थेट गुजरातला गेला.

Rice transport Truck towards Gujrat
Dhule Cash Controversy: संजय राऊत यांनी फोडला बॉम्ब, ‘अर्जुन खोतकरांसाठी १५ कोटी जमा होणार होते’

रेणुका मिलशी झालेला करारनामा रद्द करुन त्यांची बॅंक गॅंरंटी जप्त करुन त्यांच्याकडे प्रलंबित तांदळाची रक्कम केंद्राने निश्चित केलेल्या दराच्या सव्वापट वसूल करावी आणि या मिलला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेणुका राइस मिलचे संचालक राहुल भागवत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com