Dhule Politics: मशीदीवरील भोंगे हा राज्यात सत्ताधारी पक्षासाठी मोठा राजकीय विषय आहे. यावरून सतत नेते इशारे देत आंदोलने करताना दिसतात. मात्र या राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून एका जिल्ह्यात पोलिसांच्या पुढाकाराने सुखद प्रयोग यशस्वी झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या ४७२९/२०११ या आदेशानुसार धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर (भोंगे) लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत स्पष्ट निकष निश्चित केले आहे. त्याचे पालन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यावर सातत्याने वाद विवाद देखील घडत असतात.
मात्र हा विधिमंडळापासून तर संसदेपर्यंत चर्चेचा विषय ठरला. हिंदुत्ववादी संघटना आणि सत्ताधारी पक्ष याबाबत सातत्याने विशिष्ट समाजाला लक्ष्य करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विविध शहरात भोंगे हटविण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांस विविध नेत्यांनी आंदोलन देखील केले आहे. मात्र त्याला विरोध देखील तेवढाच झाल्याने हा वादाचा विषय ठरला.
या सर्व वादविवादात एक सुखद धक्का वाटावा अशी बातमी पुढे आली आहे. धुळे जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप यांनी पुढाकार घेतला. प्रत्येक पोलीस ठाण्यात सर्व धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बैठक घ्यावी. भोंगे बसविण्याबाबत नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेष म्हणजे त्याला सगळ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला
कापडणे (सोनगीर) येथे दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. वेळी सर्वांना ध्वनिक्षेपक उतरवून ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला.
त्यानंतर रीतसर परवानगी घेऊन दोन्हीक्षेपक बसवावे. आवाज आणि वापराचा कालावधी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या. विशेष म्हणजे मंदिरे आणि मशिदी सर्व धार्मिक स्थळांवरील दोन्हीक्षेपक विश्वस्तांनी स्वतःहून काढून ठेवून दिले आहेत.
धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी हा प्रयोग सुरू आहे. त्यासाठी मशिदी आणि मंदिरांच्या विश्वस्तांना विश्वासात घेतात. त्यामध्ये राजकीय नेते आणि या विषयाचे राजकारण करणारे यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्याची मोहीम जोरात सुरू आहे. येत्या काही दिवसात कदाचित हा जिल्हा भोंगेमुक्त धार्मिक स्थळांचा जिल्हा ठरू शकतो. त्यामुळे पोलिसांची आणि नागरिकांच्या सहकार्याची ही मोहीम चर्चेचा विषय ठरली आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.