Nashik crime: धक्कादायक; मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या जिल्ह्यातच तोतया ‘एफडीए’ अधिकाऱ्यांचे फुटले पेव, मंत्रालयापर्यंत लिंक?

FDA Officer Crime;Food and Drug Administration impersonator officer fraud case reaches the ministry?-नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागात खबरी बनले बनावट अधिकारी, मंत्रालयापर्यंत लिंक.
Narhari_Zirwal
Narhari_ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Nashik FDA News: प्रशासनातील अधिकारीच तोतयागिरीला पाठीशी घालू लागले तर काय होऊ शकते? याचे उदाहरण नाशिकमध्ये घडले आहे. येथे तोतया अधिकाऱ्यांनी सुपारीचे ट्रक ताब्यात घेऊन चक्क अन्न व औषध प्रशासन कार्यालयातच आणले होते. त्यामध्ये कोट्यावधीची सुपारी होती.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विविध कारणांमुळे नेहमीच लोकांमध्ये उत्सुकतेचा विषय असतात. सध्या मात्र त्यांच्या विभागाच्या कामकाजामुळे वेगळी चर्चा सुरू आहे. त्यांच्या जिल्ह्यात तोतया अधिकाऱ्यांनी कारवाई करून मोठी आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून सुपारीचे दोन ट्रक ताब्यात घेतले होते. संबंधितांवर याबाबत पोलीस कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेचच आणखी एक कारवाई झाली. ती बनावट अधिकाऱ्यांनी केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली.

Narhari_Zirwal
Chief justice Bhushan Gavai: सरन्यायाधीश गवई प्रकरण; आता बार कौन्सिलचा मुख्यमंत्री फडणवीस यांना अल्टीमेटम!

परराज्यातून कायद्याने मनाई असलेल्या सुपारीची अवैध वाहतूक करण्यात येत होती. कोट्यावधींचा हा माल परराज्यात जाणार होता. यासंदर्भात खबरीने माहिती दिल्याने प्रशासनाने कारवाई केली होती. मात्र यात चक्क दोन ट्रक खबरी आपणच एफडीएचे अधिकारी आहोत, असे सांगत जप्त करून शासकीय कार्यालयात घेऊन गेले.

Narhari_Zirwal
Chhagan Bhujbal Politics: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिल्हा परिषदेतील वर्चस्वाला कोणाचा अडथळा?

तोतया अधिकाऱ्यांना प्रशासनाचेही आशीर्वाद असल्याशिवाय थेट शासकीय कार्यालयात जाऊन अशा प्रकार करणे शक्य नाही. याबाबत चर्चा सुरू झाल्याने प्रशासनाची ही धावपळ उडाली. प्रकार थेट मुंबईत मंत्रालयात कळविण्यात आला. त्यानंतर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

याबाबत वरिष्ठांकडून विचारणा करण्यात आली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सुपारीच्या ट्रकवर तोते अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल तयार केला आहे. या अहवालात चक्क मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे.

तोतया अधिकाऱ्यांनी बंदी घातलेल्या सुपारीच्या ट्रकवर कारवाई केली. लाखो रुपयांची ही सुपारी आहे. त्यात कोणती आणि कशी मांडवली होणार होती, हा गंभीर प्रश्न आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनातील यंत्रणा एवढी बेसावध कशी अशी चर्चा आहे.

शहरात नऊ आणि दहा मे दरम्यान ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या ट्रक उद्योग भवन येथे शासकीय कार्यालयात पुढे कारवाई कशी अड्जस्ट करायची यावर चार दिवस चर्चा सुरू होते. ही चर्चा म्हणजे मांडवली काय होणार हेच होते. मात्र चार दिवस ट्रक कार्यालयात उभे असतानाही कारवाई का होऊ शकली नाही, ट्रकची चौकशी का झाली नाही अशी अनेक प्रश्न आहे. याबाबत मंत्रालयातही चर्चा सुरू झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com