Ajit Pawar Group Vs BJP  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: अजितदादा गट-भाजप नेत्यांमध्ये श्रेयवादावरून चढाओढ; नगरसेवक-सत्ताधारी भिडले..

Mangesh Mahale

Dhule : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर महायुतीत कामाच्या श्रेयवादावरून चढाओढ सुरु आहे. असाच प्रकार धुळ्यात नुकताच घडला.

धुळे महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटन फलकावरील नावावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व सत्ताधारी भाजपच्या महापौर व नगरसेवकांमध्ये वाद रंगला.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी नगरसेवक कैलास चौधरी यांनी सुचवलेल्या महानगरपालिका रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटन फलकावर नाव नसल्याने त्यांनी सत्ताधारी असलेल्या भाजपच्या महापौर प्रतिभा चौधरी यांना याचा जाब विचारला.

उद्घाटन फलकावर त्यांचं नाव नसल्यावरून उद्घाटनापूर्वीच उद्घाटन स्थळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये व सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली.

या रुग्णालयाला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मातोश्रींचे नाव देण्यात आले आहे. या वादामध्ये खासदार सुभाष भामरे यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. माजी नगरसेवक कैलास चौधरी यांना या कार्यक्रमातून डावलण्यात आल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील त्यांना देण्यात आले नसल्यामुळे या कार्यक्रमाचा त्यांनी निषेध केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT