Raipur News: छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण होणार याचा तिढा आज सुटणार आहे. नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सध्या राजकीय पंडित, विश्लेषकांमध्ये जोरदार चढाओढ सुरु आहे. ओबीसी की आदिवासी चेहरा मुख्यमंत्री होणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
विधिमंडळ पक्षाची आज (रविवारी) दुपारी बैठक होत असून यात मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपचे केंद्रीय पर्यवेक्षक सर्बानंद सोनोवाल, आणि अर्जुन मुंडा हे दिल्ली येथून रायपुरला पोहचले आहेत. विमानतळावर पोहचल्यावर दोन्ही नेत्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
सर्व आमदाराची आज दुपारी रायपूर येथील पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे तीन पर्यवेक्षक अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल, दुष्यत गौतम हे आमदारांची चर्चा करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यारे नेतृत्व भाजपला छत्तीसगड येथे पाहिजे आहे, यावर सध्या चाचपणी सुरु आहे. भाजप आदिवासी मुख्यमंत्री करणार की अन्य कुणाला संधी देणार हे आज स्पष्ट होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री पदासाठी रमण सिंह, अरुण साव, विष्णुदेव साय, ओपी चौधरी आणि रेणुका सिंह यांच्या नावाची चर्चा आहे. ओबीसी आणि आदिवासी मुख्यमंत्री करण्याबाबतही भाजपमध्ये चर्चा सुरु आहे. आदिवासी मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीयमंत्री विष्णुदेव साय आणि रेणुका सिंह यांची नावे आघाडीवर आहेत. तर ओबीसींमध्ये ओपी चौधरी आणि अरुण साव यांची नावे आघाडीवर आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५४ जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला ३४ जागा मिळाल्या आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.