Dhule Riot News : बॅनर फाडल्यावरून शिरपूर (जि. धुळे) तालुक्यातील सांगवी येथे दोन गटात गुरूवारी हाणामारी झाली. या प्रकरणात दोनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. यात तीन पोलीस अधिकारी आणि १५ कर्मचारी जखमी झाले आहेत.
तेरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे. आदिवासी दिनाचे बॅनर फाडल्यावरून दुपारी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. सांयकाळनंतरही पुन्हा हा वाद उफाळून आला.
या घटनेनंतर सांगवी गाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आला. हिंसक जमावाने रास्ता रोको केला. त्यांनी रात्री दहा वाजेनंतरही महामार्ग रोखून धरल्याने परिस्थिती आणखी चिघळली. महामार्ग जमावाने रोखून धरल्याने दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली होती. दोन्ही गटाची समजूत काढण्याच्या प्रयत्न लोकप्रतिनिधी आणि प्रशासन करीत होते.
शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, तहसीलदार महेंद्र माळी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या वाहनावर जमावाने दगडफेक केली. यात वाहनाचे नुकसान झाले. या घटनेत तहसीलदार महेंद्र माळी यांच्या गाडीचे चालक आरिफ शेख जखमी झाले आहेत.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.