j. p. Gavait  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dindori Constituency 2024 : 'माकप'ने शरद पवारांना खिंडीत पकडले; 'अजूनही वेळ आहे, दिंडोरी सोडा'

J. P. Gavit News : जे. पी. गावित यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यातच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या 'माकप'ने दिंडोरीची जागा सोडण्याची मागणी केली आहे.

Sampat Devgire

Dindori News: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीमधील खदखद सर्वांसमोर आली आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. लोकसभेच्या जागावाटपावरून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. तीनही पक्ष एकाद्या जागेवरच ठाम दिसत असल्याने तीन पक्षात मोठ्या प्रमाणात रस्सीखेच पाहावयास मिळते. त्यातच घटक पक्ष असलेल्या 'माकप'ने दिंडोरीची जागा सोडण्याची मागणी केली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election) 'माकप'चे माजी आमदार जे. पी. गावित (J P Gavit) यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. गावित यांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. ( Dindori constituency 2024)

गावित यांनी सकाळी अकराला गोल क्लब मैदानातून कार्यकर्त्यांची रॅली काढली. या रॅलीत शेकडो कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव सहभागी झाले होते. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप झाला. या वेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

माजी आमदार गावित यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्या समवेत सुभाष चौधरी, डॉ. अशोक ढवळे, उदय नारकर, गुजर अभिनेते उपस्थित होते.

या वेळी माजी आमदार गावित म्हणाले, 'आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत. त्यामुळे आमचा योग्य सन्मान झाला पाहिजे. अद्यापही वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दिंडोरी मतदारसंघातून आपला उमेदवार मागे घ्यावा. आम्हाला पाठिंबा द्यावा राज्यातील एक मतदारसंघ म्हणून दिंडोरी आम्हाला सोडावी. अन्यथा मतदार व शेतकरी योग्य निर्णय घेतील. याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो,' असा इशारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

40 नागरिकांनी अर्ज नेले

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमधून माजी आमदार गावित व सुभाष चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम निवडणूक विभागाकडे जमा केली आहे. शिवाजी बर्डे यांनीही साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम निवडणूक विभागाकडे जमा केली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 47 उमेदवारांनी 87 अर्ज खरेदी केले. नाशिक मतदारसंघातून 40 उमेदवारांनी अर्ज घेतले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT