J. P. Gavit News: दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपचे माजी आमदार जे. पी. गावित उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला एक जागा सोडायला हवी होती. मात्र, त्यांनी आमच्या मागणीचा विचार केला नाही, अशी टीका केली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीत फूट पडली आहे. माकप आता स्वतंत्र उमेदवारी करणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील मतांची विभागणी होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवार गावित यांनी विरोधकांकडून होणारे हे आरोप खोडले आहेत. माझ्यामुळे भाजप उमेदवाराला फायदा होणार नाही. उलट मीच म्हणतो की राष्ट्रवादीच्या उमेदवारामुळे भाजपला फायदा होणार आहे. loksabha Election 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी आपल्या मागणीचा विचार केला नाही. आम्ही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीदेखील मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कोतवाल, शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम, येवल्याचे आमदार किशोर दराडे आदी नेते आमच्याबरोबर होते. त्यांनीदेखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फारसा प्रभाव पडणार नाही. त्यामुळे ही जागा माकप पक्षाला सोडायला हवी होती. राष्ट्रवादी काँग्रेसने NCP राज्यात दहा जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यातील एक जागा त्यांनी आम्हाला द्यावयास हवी होती. आम्ही मिळून सर्वच्या सर्व दहा जागा निवडून आणल्या असत्या असा दावा त्यांनी केला.Dindori Constituency 2024
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारामुळे भारतीय जनता पक्षाच्या BJP उमेदवाराचा लाभ होईल, असा आरोप केला जातो. हा आरोप गावित J.P.Gavit त्यांनी नाकारला. ते म्हणाले, मीच खरा प्रबळ उमेदवार आहे. गेली सात वेळा मी आमदार होतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आम्हीच आंदोलने केली आहेत. त्यांचे प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी आम्हाला ओळखतात. आम्हाला मतदान करतात. याउलट भाजपच्या डॉ. भारती पवार यांना मतदान प्रतिसाददेखील देत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP उमेदवार भास्करराव भगरे Bhaskar Bhagare यांना लोक ओळखतही नाही. त्यांना थेट शाळेतून निवडणुकीच्या रिंगणात आणले आहे. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघातून Dindori Loksabha Constituncy माकप विजयी होईल.
दिंडोरी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या डॉ. पवार Bharati pawar यांना महाविकास आघाडीचे भास्कर भगरे Bhaskar Bhagare यांनी आव्हान दिले आहे. माकप महाविकास आघाडीचा MVA घटक पक्ष आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांचा इंडिया आघाडीत समावेश आहे. आता माजी आमदार गावित माकपचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे दिंडोरी वगळता राज्याच्या अन्य भागात माकप महाविकास आघाडी MVA सोबत राहील. दिंडोरी मतदारसंघात मात्र आघाडीत फूट पडली आहे. त्याचे नुकसान राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होऊ शकते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.