J. P. Gavit politics: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे माकपचे जे. पी. गावित (J.P.Gavit) यांनी उमेदवारी करण्याचा संकल्प केला आहे. आजपासून त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय चाचपणी सुरू केली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून भास्करराव भगरे हे उमेदवार आहेत. या जागेवर 'माकप'नेदेखील दावा केला आहे. मात्र, आघाडीकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) पेच आहे.
या पार्श्वभूमीवर कम्युनिस्टनचे संभाव्य उमेदवार माजी आमदार जे. पी. गावित यांनी काल ओझर येथे शांतीगिरी महाराज यांची घेतली. या वेळी त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. सुमारे अर्धा तास शांतीगिरी महाराज आणि गावित यांच्या सहकाऱ्यांची चर्चा झाली. त्यामुळे दोन्ही समर्थकांसाठी ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे. शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) गावित यांना पाठिंबा देणार की नाही, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. स्वतः शांतीगिरी महाराज हेदेखील निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. त्यांनी नाशिक मतदारसंघातून आपला प्रचारदेखील सुरू केला आहे.
गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) नेते शरद पवार यांची भेट घेऊन दिंडोरी मतदारसंघ माकपला मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र, त्याबाबत एक मत होऊ शकले नव्हते. महाविकास आघाडीच्या जागावाटपात दिंडोरी मतदारसंघ शरद पवार गटाला देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गावित यांनी सातत्याने पाठपुरावा करून या मतदारसंघात उमेदवारी करण्याची तयारी दाखवली होती. महाविकास आघाडीकडून प्रतिसाद न मिळाल्याने हा पक्ष आता स्वतंत्र उमेदवारी करण्याच्या तयारीत आहे.
आजपासून गावित यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय आपला दौरा सुरू केला आहे. येत्या 13 एप्रिलपर्यंत ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते आणि मतदारांचा कौल घेणार आहेत. या संदर्भात नुकतीच माकपच्या पॉलिट बिरोची बैठक मुंबई येथे झाली. या बैठकीत दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा निर्णय झाला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय समितीला पाठविण्यात आला आहे. या समितीने संमती दिल्यास गावित उमेदवारी अर्ज दाखल करतील. गावित यांचा मतदारसंघातील पेठ, सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी तालुक्यांमध्ये चांगला प्रभाव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सुमारे 90 हजार मते मिळाली होती. त्यामुळे गावित यांची उमेदवारी कोणाची वाट अवघड करणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.
Edited BY : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.