Bharti Pawar Narendra Modi  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dindori Lok Sabha : डॉ.भारती पवारांसाठी पंतप्रधान मोदींची सभा ठरणार 'टर्निंग पॉईंट'

संपत देवगिरे : सकाळ वृत्तसेवा

Narendra Modi News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार Bharti Pawar उमेदवार आहेत. पाचव्या टप्प्यातील या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यात आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एन्ट्री होत आहे. सुरुवातीला भारती पवार यांच्या विरोधात पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, माजी खासदाराने उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर तो मागे देखील घेण्यात आला. शरद पवार गटाकडून या निवडणुकीसाठी ताकद लावली जात आहे. त्यामुळे येत्या बुधवारी (ता.15) नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा होत आहे. ही सभा भारती पवार यांच्यासाठी 'टर्निंग पॉईंट' ठरण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या BJP प्रचाराच्या नियोजनात शेवटच्या टप्प्यात राष्ट्रीय नेत्यांच्या जाहीर सभांवर भर देण्यात आला आहे. यानिमित्ताने स्थानिक आणि व्यक्तिगत प्रश्नांऐवजी राष्ट्रीय प्रश्नांकडे मतदारांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यातून मतदारसंघातील वातावरण भारतीय जनता पक्षाला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.येत्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा होत आहे. नाशिक Nashik Loksabha दिंडोरी आणि धुळे या तीन मतदार संघासाठी पंतप्रधान मोदी यांची ही सभा असेल.

या सभेत प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे व्हिजन आणि गेल्या पाच वर्षातील विविध राष्ट्रीय स्तरावरील कामकाजाचा आढावा सादर होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांकडे नेण्यात येईल. त्यामुळे राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवारापुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे. त्यामुळे विरोधकांनीही पंतप्रधान मोदी यांच्या सभेकडे लक्ष केंद्रित केले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रीय नेत्याची नाशिक जिल्ह्यात होणारी ही पहिलीच सभा आहे. त्यानंतर भाजप अन्य नेत्यांनाही प्रचारात उतरवणार आहे. या कालावधीत लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा घेऊन वातावरण बदलविण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे दिंडोरी मतदार संघासह अन्य उमेदवारांना या सभेबाबत विशेष अपेक्षा आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीत प्रामुख्याने राज्यस्तरीय पक्ष आहेत. या मतदारसंघांमध्ये धुळे वगळता अन्यत्र काँग्रेस पक्षाचा उमेदवार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयत्न ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांवर भर असेल. उद्धव ठाकरे यांची दिंडोरीत सभा नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील प्रचारात कोणते मुद्दे चर्चेत येतात, हे महत्त्वाचे ठरेल. पंतप्रधान मोदी विरोधकांना आपल्या शाब्दिक जाळ्यात अडकवून निवडणुकीचे वातावरण फिरविण्यात माहीर मानले जातात. त्यामुळे दिंडोरी मतदार संघातील मोदी यांची सभा भाजपला किती लाभदायी ठरावी अशी महायुतीच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT