Congress Meeting at Raver
Congress Meeting at Raver Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भेदभाव सोपा, सर्वांना बरोबर घेण्याची क्षमता केवळ काँग्रेसकडे!

Sampat Devgire

रावेर : सर्व समाजांतील घटक, धर्म आणि देशातील नागरिकांना एकत्र घेऊन गुण्या गोविदांने पुढे जाण्याचे कसब व क्षमता केवळ काँग्रेस पक्षातच आहे. आज सत्तेत असलेले पक्ष प्रत्येकाला धमकावण्याचे काम करीत आहेत. अशी मंडळी जनतेचे कधीच भले करू शकत नाहीत. त्यांना बाजुला करण्यासाठी काँग्रेस (Congress) पक्ष मजबुत करावाच लागेल, असे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी केले.

तालुक्यात कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे विचार, कार्य घराघरांत पोहोचवून डिजिटल सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्ष सक्रीय होता. आज सत्तेत असलेले लोक तुमच्या आमच्या राष्ट्रप्रेमाविषयी प्रश्न उपस्थित करतात, ते तेव्हा कुठे होते. स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या उभारणीत ज्यांनी त्याग व बलिदान दिले, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातून राजकारणाचा दर्जा या मंडळींनी खालावला आहे. हे वास्तव व काँग्रेसची विचारधारा घरोघर पोहोचवली पाहिजे.

रावेर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली. जनमानसात जाऊन काँग्रेसचा सदस्य बनविणे हा या अभियानाचा हेतू आहे. यासाठी सदस्य नोंदणी महत्त्वाची असून, बुथ कमिटीच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण व आमदार शिरिष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, महिला जिल्हा अध्यक्षा सुलोचना वाघ यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रशिक्षक जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांनी तालुक्यातील कॉंगेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथप्रमुखांना सखोल माहिती दिली.

मावळते नगराध्यक्ष दारा मोहंमद, अनुसूचित जाती महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा मोरे, युवक मागसवर्गीय जिल्हाध्यक्ष राजू सवर्णे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, उपाध्यक्ष विनायक महाजन, युवक तालुकाध्यक्ष योगेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पाटील, महिला कॉंगेस अध्यक्षा मानसी पवार, युवक काँग्रेस तालुका सचिव शोएब खान, सेवादलाचे भरत कुंवर, आदिवासी सेलचे दिलरुबाब तडवीउपस्थित होते.

-------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT