sanjay raut | nana patole sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : पवारांच्या राष्ट्रवादीची मध्यस्थी निष्फळ; ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये 12 जागांवरून तिढा कायम

Mahavikas Aghadi Seat Sharing Of Assembly Election 2024 : राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील बहुतांश जागावाटपंच काम पूर्ण झालं आहे. या संदर्भात शनिवारी सायंकाळी आणि रविवारी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाली आहे. मात्र, नागपूरच्या दोन आणि नाशिकच्या मध्य मतदारसंघासह राज्यातील बारा जागांवरील वाद कायम आहे.

Sampat Devgire

Congress Vs Shivsena UBT : नाशिक मध्य मतदारसंघासह राज्यातील 12 जागांवरून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद टोकाला गेला आहे. या मतदारसंघावर दोन्ही पक्षांचा प्रबळ दावा असल्यामुळे या वादावर तोडगा कधी निघणार याची प्रतीक्षा आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील बहुतांश जागावाटपंच काम पूर्ण झालं आहे. या संदर्भात शनिवारी सायंकाळी आणि रविवारी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाली आहे. मात्र, नागपूरच्या दोन आणि नाशिकच्या मध्य मतदारसंघासह राज्यातील बारा जागांवरील वाद कायम आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला यातील काही मतदारसंघाबाबत कोणतीही तडजोड मान्य नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) या जागांसाठी आग्रही आहेत. आज दुपारी मुंबईत झालेल्या चर्चेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अन्य नेत्यांची या जागांवरून शाब्दिक चकमक देखील झाली.

अखेर कालावधी मर्यादित असलेल्या या जागांचा वाद नंतर सोडविण्याचे ठरले आहे. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जागावाटपांचा तपशील आणि संभाव्य उमेदवारांची यादी घेऊन काही वेळात दिल्लीला रवाना होणार आहेत. आज दिल्लीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हिमाचल भवनमध्ये सायंकाळी सातला बैठक आहे.

या बैठकीत याबाबतचा अंतिम तोडगा काढण्यात येणार आहे. तर सांयकाळी उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. काँग्रेस (Congress) पक्ष आपल्या हक्काच्या मतदारसंघांबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्यास तयार नाही. विशेषत: लोकसभा निवडणुकीनंतर या पक्षाच्या नेत्यांच्या अपेक्षा जास्तच वाढल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांतील विसंवाद वाढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून याबाबत मध्यस्थीचा प्रयत्न होत आहे. नाशिक शहरातील नाशिक मध्य हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असल्याने ही जागा सोडण्याची त्यांची तयारी नाही. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून येथे माजी आमदार वसंत गीते यांना उमेदवारी देण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

माजी आमदार गीते यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील आणि राहुल दिवे हे दोन प्रबळ इच्छुक या मतदारसंघासाठी आग्रही आहेत. आता या स्थितीत कोण माघार घेतो यावर हा तिढा सुटणार कसा? हे अवलंबून आहे एकंदरच काल सुरू असलेला वाद आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT