Manoj Jarange Patil : ज्यांनी मराठ्यांना संपवलं, त्याला संपवायचंच; जरांगेचा एल्गार, कुणाचे उमेदवार पाडणार?

Maharashtra Assembly Election Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या बैठकीत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीची धडधड वाढवणारा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. ज्यांनी मराठ्यांना संपवलं, त्याला संपवायचंच, असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे. पण ते नेमक्या कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करणार, कुठे-कुणाला पाठिंबा देणार, हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत गुलदस्त्यात असेल.

कोणत्या जागेवर उभे करायचे, हे आता आपण पाहणार आहोत. आता सर्व 288 मतदारसंघात फॉर्म भरायचे, सर्व जाती-धर्मातील अर्ज भरू शकतो. कुठे उमेदवार निवडून येऊ शकतात, कुठे मराठ्यांची ताकद, कुठे दलित-मुस्लिमांची मते जास्त आहेत, याचे समीकरणही जुळले पाहिजे. मी ती जुळवाजुळव करत आहे, असे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मोठी बातमी : मनोज जरांगेंचा निवडणुकीचा फॉर्म्यूला ठरला; कुठे उमेदवार देणार, कुठे पाडणार?

एका जातीवर उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. मी समीकरण जुळवत आहे. जर समीकरण जुळले नाही तर अवघड आहे. त्यामुळे आता अर्ज भरून ठेवा. मी 29 तारखेला सांगेन कुणी अर्ज मागे घ्यायचा? मागे घे म्हटले की त्या प्रत्येकाला अर्ज मागे घ्यावा लागेल. त्याने जर अर्ज मागे घेतला नाही तर त्याने एखाद्या पक्षाकडून पैसे घेतल्याचे आपण समजायचे, असेही जरांगे म्हणाले.

संमिश्र ताकद ठेवली, तर मराठा जिंकू शकतो. एक कोपरा धरून चालला, तर मराठा हारू शकतो. कोणत्या मतदारसंघात मराठा विजयी होऊ शकतो, कोण निवडून येऊ शकतो. बाकी पाडू, बाकीचे निवडून आणू, हे सगळे समीकरण जुळवू. एखाद्या जिल्ह्यात कुणी ऐकलं नाही तर तिथून मी अंग काढून घेईन. जवळपास 36 मतदारसंघात केवळ मराठ्यांच्या मतांवरच निवडून येऊ शकतात. प्रत्येक ठिकाणी एक लाख मतदान आहे, असे जरांगेंनी सांगितले.

Manoj Jarange Patil
Ajit Pawar Politics: नाशिकमध्ये अजित पवारच महायुतीत मोठा भाऊ, ७ उमेदवार निश्चित!

मी वेळोवेळी सुचना देईन. ज्यांनी मराठ्यांना संपवलं, त्याला संपवायचंच, हे लक्षात ठेवा. आता ज्यांना-ज्यांना फॉर्म भरायचेत त्यांनी भरा. जिथे निवडून आणि शकतो तिथे मेरिट ठरवून एक फॉर्म ठेऊ. कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभा करायचा, हे दोन-तीन दिवसांत सांगेन, असे जरांगेंनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com