Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse: जिल्हा दूध संघाचे काम पारदर्शीच!

Sampat Devgire

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघात (Milk federation) कोणताही गैरव्यवहार नाही, काम अत्यंत पारदर्शी आहे. याचे आपल्याला समाधान आहे, असे मत राज्याचे मंत्री आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले. संघाच्या ५१ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. (Eknath Khadse said milk federation have done nice work for farmers)

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार एकनाथ खडसे उपस्थित होते.

आमदार खडसे म्हणाले, कि संघात कोणताही गैरव्यवहार नाही याचे आपल्याला समाधान आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत संघाने केलेली ७२ कोटी रूपयाची गुंतवणूक संघाच्या पुढील पन्नास वर्षापर्यंत उपयोगी पडेल असे सांगितले, तसेच संघाने अत्याधुनिक तत्रज्ञांनाचा उपयोग करून चांगली सेवा देण्याबाबत लक्ष द्यावे असेही मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी सभेत मागील साधारण सभेचे प्रोसेसिंग वाचून कायम करण्यात आले. गेल्या वर्षी संघाला तब्बल दोन कोटी रुपये नफा झाला आहे. सभासदांनी संस्थेला पुरविलेल्या दुधाला तीन पैसे प्रतिलिटर भावफरक जाहीर करण्यात आला आहे.

संघाच्या विद्यमान संचालकांचा कालावधी संपला आहे. मात्र निवडणुका पुढे ढकलल्याने विद्यमान संचालकांना दोन वर्षाचा अधिक कालावधी मिळाला आहे. अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे, संस्थेच्या नवीन विस्तारित प्रकल्प सुरू करण्यात आला, तसेच २.३७ हजार लिटर दूध खरेदी केले, व सरासरी १.९१ हजार लिटर दूध दररोज विक्री केले. या शिवाय दुग्धजन्य पदार्थाचीही विक्री केली, संघास सतत ऑडिट ‘अ’ वर्ग मिळत असल्याची माहिती देण्यात आली.

संघातर्फे म्हैस दुधास ४६.७२ पैसे प्रतिलिटर व गायी दुधास २८.४१ पैसे प्रति लिटर भाव असल्याचे सांगण्यात आले. सभासदांना पुढील वर्षी दुधाची रक्कम बँकेत न देता,बँकेव्दारे त्यांच्या संस्थेमध्येच केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सभासदांनीही आपल्या अडचणी मांडल्या. सभेस ४८१ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी संचालक ॲड.वसंतराव मोरे, डॉ.संजीव पाटील, हेमराज चौधरी, जगदीश बढे, अशोक चौधरी, सुभाष टोके, श्‍यामलताई अतुल झांबरे, डॉ.पूनम प्रशांत पाटील, कार्यकारी संचालक मनोज लिमये आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT