Shinde Group: आज ना उद्या बबनराव घोलप शिंदेंसोबत येतील!

म्युनिसिपल कर्मचारी सेना हातातून निसटल्यावर शिवसेनेच्या पायात साप सोडण्याचा प्रकार
Babanrao Gholap & Pravin Tidme
Babanrao Gholap & Pravin TidmeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा (Municiple workers sena) अध्यक्ष केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे (Employees issues) प्रश्न सोडविण्याऐवजी प्रवीण तिदमे (Pravin Tidme) यांचीच नोकरी वाचविण्यासाठी मला प्रयत्न करावे लागले. असा दावा करणारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप (Shivsena Deputy leader Babanrao Gholap) हे आज न उद्या आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या सोबत असतील असा दावा शिंदे गटाचे (Shinde Group) महानगरप्रमुख तिदमे यांनी करत शिवसेनेच्या पायात साप सोडण्याचा प्रयत्न केला. (Shinde group`s Pravin tidme claims Baban Gholap wiil joins there group in Future)

Babanrao Gholap & Pravin Tidme
Dada Bhuse...आणि पालकमंत्री दादा भुसे काहीच करू शकले नाही?

तिदमे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की बबन घोलप यांनी सुधाकर बडगुजर यांच्याऐवजी एखाद्या कामगाराची नियुक्ती केली असती किंवा अन्य नगरसेवकाला संधी दिली असती तर म्युनिसिपल कर्मचारी सेनेवरचा दावा आम्ही सोडलाही असता. घोलप हे वरिष्ठ नेते आहेत. माजी आमदार योगेश घोलप यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांच्यासमोर विधानसभेची उमेदवारी करायची तर त्यांनाही महाविकास आघाडी समोर अन्य पक्षात प्रवेश घ्यावा लागू शकतो.

Babanrao Gholap & Pravin Tidme
Shivsena: शिंदे गटाच्या प्रविण तिदमे यांना दिलासा; शिवसेनेला धक्का!

ते म्हणाले, बबन घोलप, योगेश घोलप हे आमच्या सोबत आले तर त्यांच्या अनुभवाचा पक्ष वाढीसाठी निश्चितच लाभ होईल. त्यामुळेच आम्ही घोलप यांना विरोध न करण्याचे ठरविले होते. मात्र, ज्यांच्यामुळे सामान्य सैनिक त्रस्त आहेत, जे आमच्या मागून पक्षात आले आणि आज हुकूमशहा बनले. त्यांनाच तुम्ही म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्षपद देणे अयोग्य आहे.

त्या पदाचा फायदा कामगारांना न मिळता स्वतःसाठीच अधिक होण्याचा धोका अधिक आहे. महानगरप्रमुख पद स्वतःकडे असताना म्युनिसिपल सेनेचे ही अध्यक्षपद स्वतःकडे घेऊन एकाधिकारशाहीचा प्रयत्न होतोय. घोलप यांनी अन्य कोणाचा अध्यक्षपदासाठी विचार केल्यास आम्हीही संघटनेवरचा दावा सोडला असता. कारण, आज ना उद्या घोलप मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासोबत असतील, याची आम्हाला खात्री आहे. असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com