Dr. Nilam Gorhe: भुजबळांच्या भेटीत सरस्वतीबद्दल माहिती जाणून घेईन!

डॅा. निलम गोऱ्हे यांनी नाशिकमधून ‘बये दार उघड’ ही मोहीम सुरु केली
Dr. Nilam Gorhe
Dr. Nilam GorheSarkarnama

नाशिक : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महिला देवतांबद्दल (Goddess SARSWATI) असहिष्णुता दाखवू नये. आम्ही सरस्वती आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) या दोघींना वंदन करतो. श्री. भुजबळ यांची भेट झाल्यावर त्यांना सरस्वतीबद्दल काय माहिती आहे, हे जाणून घेणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॅा. निलम गोऱ्हे (Dr. Nilam Gorhe) यांनी केले. (Shivsena Leader Dr. Nilm Gorhe says we respect both SARSWATI & Savitribai Phul)

Dr. Nilam Gorhe
Shinde Group: आज ना उद्या बबनराव घोलप शिंदे सोबत येतील!

यावेळी त्या म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाला सर्व राजकीय पक्षांना संपवायचे आहे. हे या पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. या पक्षातर्फे कधी कुजबूज मोहीम राबवले जाते, तर ट्रोलिंगच्या माध्यमातून रोजगाराचा उद्योग केला जातो.

Dr. Nilam Gorhe
Shivsena: शिंदे गटाच्या प्रविण तिदमे यांना दिलासा; शिवसेनेला धक्का!

यावेळी त्यांनी नंदूरबारच्या युवतीवरील अत्याचाराच्या घठनेबाबात पोलिसांच्या तपासाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मुलींवर बलात्कार करायचा, तिची आत्महत्या दाखवायची आणि पोलिसांनी त्यावर झाकण घालायची, अशी कार्यपद्धती महाराष्ट्रातील अत्याचाराची असल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केला. तसेच महिला-मुलींवरील अत्याचाराच्या न्यायाविषयीचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे. पण त्यावर त्यांचे उत्तर मिळाले नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

नवरात्रोत्सवानिमित्त महिला-मुलींची सुरक्षितता, प्रगती आणि न्याय मिळावा म्हणून शिवसेनेच्या महिला आघाडी आणि युवासेनेतर्फे ‘बये दार उघड’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याची सुरवात डॉ. गोऱ्हे यांनी नाशिकमधून केली. चांदवडमध्ये त्या रेणुकामातेचे दर्शन घेणार आहेत. तसेच बुधवारी (ता. २८) श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती भगवतीदेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. पुढे कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानीमाता, माहुरची रेणुकामाताचे त्या दर्शन घेणार आहेत. या मोहिमेची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी सरकारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ज्योतीताई ठाकरे, संगीता खुदाना, शोभाताई मगर, शोभाताई गटकळ, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागूल आदी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की महिला आघाडीतर्फे शक्तीदेवीच्या ६१ मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाणार आहे. तसेच महिला, भाविकांशी संवाद साधत अन्नदान केले जाणार आहे. चांदवड आणि सप्तशृंग निवासिनीचा प्रसाद दसरा मेळाव्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला जाणार आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com