Dr Ashok Ueeke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Ashok Ueeke: डॉ गावित गेले, डॉ अशोक उईके आले अन् सगळ्यांना कामाला लावून गेले!

Dr Ashok Ueeke; new tribal minister order officers night stay in tribal schools-आदिवासी विकास मंत्र्यांचा पदभार घेतल्यानंतर डॉ अशोक उईके यांनी नाशिक येथे आपल्या विभागाचा आढावा घेतला.

Sampat Devgire

Tribal news: प्रदीर्घकाळ डॉ विजयकुमार गावित आदिवासी विकास विभागाचे मंत्री होते. आता डॉ अशोक उईके हे नवे मंत्री आहेत. त्यांनी पदभार स्वीकारताच जुन्या आणि रुळलेल्या अधिकाऱ्यांची झोप उडविण्याचे ठरवलेले दिसते.

राज्याच्या आदिवासी विकास विभागाचा कारभार नाशिकहून होतो. सध्याचे नवे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनीही काल नाशिकला बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचीही चांगलीच झाडाझडती घेतली.

विशेष म्हणजे या खात्याचा कारभार प्रदीर्घकाळ नंदुरबारचे डॉ विजयकुमार गावित यांच्याकडे होता. यंदा डॉ गावित यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे नव्याने कार्यभार हाती घेतलेल्या डॉ उईके यांनीही आपल्या नव्या कल्पना राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि प्रस्थापित अधिकाऱ्यांना अस्वस्थ वाटणे स्वाभाविक आहे.

आदिवासी आश्रम शाळांच्या बाबत अनेक तक्रारी असतात. या शाळांच्या दर्जाबाबतही सातत्याने टीका होत असते. याबाबत अनेक प्रश्न असल्याने त्याची सोडवणूक कशी करणार हा प्रत्येक अधिकारी आणि मंत्र्यापुढे प्रश्न असतो. यावर आदिवासी विकास मंत्री डॉ उईके यांनी नवा उपाय शोधला आहे.

यापुढे अधिकाऱ्यांनी आदिवासी आश्रम शाळांवर मुक्कामी राहावे. त्यामुळे तेथील विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांची चांगला संवाद करता येईल. त्यातून खरे प्रश्न समजतील आणि त्याची सोडवणूक देखील करता येईल, असे मंत्री डॉ उईके यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले.

नव्याने कारभार हाती घेतल्यामुळे त्यांनी अनेक कल्पना मांडल्या. बहुतांशी विषय अनेक वर्षांपासून मांडले जात आहेत. मात्र त्यावर केवळ घोषणा झाल्या. कार्यवाही केव्हा होणार याची अद्यापही प्रतीक्षा आहे.

मंत्री म्हणाले, प्रत्येक आदिवासी पाडा हा मुख्य रस्त्याला जोडला गेला पाहिजे. त्यासाठी गाव आणि पाडा मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी नवे रस्ते बांधावेत. यासंदर्भात तातडीने नियोजन करून अहवाल सादर करावा. विद्यार्थ्यांच्या विविध सुविधांबाबतही त्यांनी अनेक सूचना केल्या.

त्यामुळे नवे मंत्री आल्याने आदिवासी विकास विभागाशी संबंधित विविध महामंडळे आणि संस्थांना आता आपल्या रुळलेल्या वाटा बदलाव्या लागतील. कामाच्या पद्धतीतही बदल करावा लागेल, असा संकेत मंत्र्यांनी दिला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT