Dr Bharti Pawar & Dilip Borase Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Bharati Pawar Politics: डॉ भारती पवार यांच्या एन्ट्रीने बागलाणच्या भाजपच्या राजकारणात नवे पर्व?

Dr. Bharti Pawar politics, BJP MLA Dilip borse uncomfortable, Pawar interested for baglan-माजी खासदार भारती पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेने आमदार दिलीप बोरसे अस्वस्थ?

Sampat Devgire

BJP Politics News: बागलाण विधानसभा मतदारसंघ यंदा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. येथे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. या आमदारांना भाजपमधूनच मोठे आव्हान मिळण्याची चिन्हे आहेत.

बागलाण मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्यात प्रत्येक विषयावर राजकीय स्पर्धा असते. बोरसे आणि चव्हाण हे या मतदारसंघातील पारंपरिक लढतीचे उमेदवार आहेत.

यामध्ये यंदा मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उच्चशिक्षित आणि (कै) ए. टी. पवार यांचा राजकीय वारसा असलेल्या डॉ भारती पवार यांचा संभाव्य उमेदवार म्हणून भाजप कार्यकर्त्यांक़ून नाव घेतले जात आहे.

बागलाण हा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झाला. यातील अडतीस गावे पूर्वीच्या (कै) ए.टी. पवार यांच्या कार्यक्षेत्रातील आहेत. कळवण आणि बागलाण या तालुक्यांची सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडण यात मोठे साम्य आहे. तेच राजकारणात दिसून येते.

हे दोन्ही मतदारसंघ आदिवासीबहुल आहेत. त्यामुळे ते आदिवासी राखीव आहेत. सर्वसाधारण गटातील मतदार आणि शेतकरी यांचा या निवडणुकीवर मोठा प्रभाव असतो. त्या दृष्टीने माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे नाव इच्छुक उमेदवार म्हणून घेतले जात आहे.

भाजपचे विद्यमान आमदार बोरसे या चर्चेने अस्वस्थ असल्याचे लपून राहिलेले नाही. याबाबत त्यांच्या समर्थकांतही डॉ. पवार यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा आहे. त्यातून भाजपच्या अंतर्गत राजकारणात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत.

भाजपकडे या मतदारसंघातून फारसे इच्छुक उमेदवार नाहीत. अशा स्थितीत विद्यमान आमदार बोरसे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री पवार यांच्या उमेदवारीच्या स्पर्धेत पक्ष कोणाला कौल देतो याची उत्सुकता आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये माजी आमदार दीपिका चव्हाण यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. डॉ मच्छिंद्र बर्डे, जयश्री गरुड, गणेश अहिरे, पोपट अहिरे, राजेंद्र मोरे यांची नावे देखील इच्छुक म्हणून आहेत. भाजपच्या आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पोपट अहिरे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी तयारी केली आहे.

बागलाण विधानसभा मतदार संघात सध्या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात टोकाची राजकीय स्पर्धा आहे. त्यामुळे येथे या आघाड्यांच्या उमेदवारात सरळ सामना होईल, अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने नवा चेहरा म्हणून माजी खासदार डॉक्टर पवार नवा डाव टाकण्याची चिन्हे आहेत.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT