Shirish Kotwal & Dr Rahul Aher Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Rahul Aher Won: `भाऊबंदकी`वर मात करीत भाजपच्या राहुल आहेर यांनी मैदान मारले!

Dr Rahul Aher; BJP's MLA Dr Rahul Aher and Congress Shirish katwal faced Rebellion within the party-भाजपचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी बंडखोरांना धडा शिकवत ४८ हजारांच्या मताधिक्याने विजय संपादन केला. भाजपचे बंडखोर केदा आहेर तिसऱ्या स्थानी

Sampat Devgire

Dr Rahul Aher Won: बंडखोरीने चर्चेत आलेल्या चांदवड-देवळा मतदारसंघात भाजपचे डॉ राहुल आहेर यांनी हॅटट्रीक केली. त्यांनी भाऊबंदकी तसेच आपल्या परंपरागत विरोधकांचा धुव्वा उडवत ४८ हजार मताधिक्याने विजय संपादन केला.

या मतदारसंघात आज शेवटच्या फेरीअखेर भाजपचे डॉ. आहेर यांना एक लाख चार हजार ३ मते मिळाली. प्रहार संघटनेचे गणेश निबांळकर अनपेक्षितरित्या पंचावन्न हजार ४६० मते मिळवून दुसऱ्या स्थानी राहिले. सर्वच नेत्यांना आपल्या मागे उभे करीत बंडखोरी केलेले भाजपचे व आमदार आहेर यांचे बंधू केदा आहेर यांना अठ्ठेचाळीस हजार ४२२ तर अती आत्मविश्वासाने मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या शिरीष कोतवाल तेवीस हजार ९ मते घेत चौथ्या स्थानी फेकले केले.

चांदवड देवळा मतदार संघात भौगोलिक राजकीय वर्चस्ववादाचा वाद राहिला आहे. यामध्ये देवळा येथून मिळणाऱ्या निर्णायक मतांच्या आघाडीने गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या डॉ आहेर यांना निवडणुकीत यश मिळाले होते. यंदा मात्र त्यांना घरातूनच बंडखोरीचे आव्हान मिळाले.

भाजपचे नेते व बंधू केदा आहेर यांनी बंडखोरी केली होती. भाजपच्या या बंडखोरीला चांदवड बाजार समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे संजय जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार उत्तम भालेराव व डॉ आत्माराम कुंभार्डे ही नेते मंडळी देखील बंडखोर केदा आहेर यांच्या मागे उभी राहिली होती. मात्र ते फारसा प्रभाव दाखवू शकले नाही.

त्यामुळे ही निवडणूक भाजप आणि काँग्रेस दोघांनाही आव्हानात्मक होती. या मतदारसंघातून प्रहार संघटनेतर्फे गणेश निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे भाजपच्या बंडखोऱ्यासह येथे चौरंगी लढत पाहायला मिळाली.श्री निंबाळकर हे चांदवडच्या पूर्व भागात वर्चस्व असलेले आणि शेतकरी प्रश्नांवर काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या चांदवड आणि भाजपच्या देवळा या दोन्ही हक्काच्या पॉकेटमध्ये वाटेकरी होते. मत विभागणी अटळ असल्याने या मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. काँग्रेससाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर भाजपसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती.

आमदार डॉ आहेर हे तिसऱ्यांदा मतदारांचा कौल घेत होते. गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचे माजी आमदार कोतवाल यांनी त्यांना लढत दिली. यंदा महा विकास आघाडी तर्फे कोतवाल उमेदवारी करीत होते त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संघटनात्मक मदत झाली. आजचा निकाल काँग्रेस आणि माजी आमदार कोतवाल यांना सपशेल नाकारणारा ठरला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT